|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » उद्योग » मारुतीच्या कारसाठी सर्वाधिक वेटिंग

मारुतीच्या कारसाठी सर्वाधिक वेटिंग 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

मारुती सुझुकी इंडियाच्या कारसाठी सर्वाधिक प्रतीक्षा यादी असल्याचे समोर आले आहे. कंपनीच्या काही मॉडेल्सची डिलिव्हरी होण्यासाठी कमाल पाच महिन्यांचा वेळ लागू शकतो. मारुती सुझुकीच्या बलेनो, व्हिटारा ब्रेझ्झा यासारख्या गाडय़ांना सर्वाधिक मागणी आहे. मारुती व्यतिरिक्त होंडा मोटर्स, टाटा मोटर्स आणि टोयोटाकडून दाखल करण्यात आलेल्या कारची प्रतिक्षा यादी मोठी असल्याचे समजते.

सध्या बाजारात मारुती सुझुकीची सर्वात लोकप्रिय कार कॉम्पॅक्ट एसयूव्ही व्हिटारा बेझ्झा आहे. दिल्लीतील विक्रेत्यांच्या मते, या कारसाठी पाच महिन्यांचा प्रतिक्षा कालावधी आहे. मारुतीने गेल्या वर्षी मार्च महिन्यात व्हिटारा बेझ्झा दाखल केली होती. कंपनीने आतापर्यंत 1 लाख युनिटपेक्षा जास्त कारची विक्री केली आहे.

व्हिटारानंतर सर्वाधिक मागणी बलेनो कारला आहे. व्हिटारा बेझ्झाच्या एक वर्ष अगोदर ही कार दाखल करण्यात आली आहे. या कारचाही वेटिंग कालावधी पाच महिन्यांचा आहे. बेलेनोला चांगली मागणी असल्याने स्विफ्ट ही याच कंपनीच्या मागणीत परिणाम झाला आहे. प्रिमियम हॅचबॅक प्रकारातील इग्निस कारसाठी 10 हजार वेटिंग आहे. नवी दिल्लीमध्ये कारसाठी 3 महिन्यांचा प्रतीक्षा कालावधी आहे. या कारच्या मॉडेलनुसार या कालावधीमध्ये फरक आहे.

होंडा कंपनीने नुकतीच सादर केलेल्या फेसलिफ्ट या सिटी कारला चांगली मागणी आहे. या कारचा प्रतीक्षा कालावधी तीन महिन्यांचा आहे. याव्यतिरिक्त कॉम्पॅक्ट एसयूव्ही डब्ल्यू-व्ही या नवीन कारसाठी दोन महिन्यांची वाट पहावी लागेल. टाटाच्या टिगोर कारसाठॅ 10 आठवडय़ांचा वेळ लागू शकतो. टोयोटाच्या फॉर्च्युनरला चांगली मागणी असून साधारण तीन महिन्यांचा वेळ लागू शकतो.

Related posts: