|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » पलूसमध्ये दोन गटात राडा : सहाय्यक पोलीस निरीक्षक जखमी

पलूसमध्ये दोन गटात राडा : सहाय्यक पोलीस निरीक्षक जखमी 

प्रतिनिधी/ पलूस

पलूस शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच बुधवारी दुपारी माजी जि.प.सभापती खाशाबा दळवी व  माजी जि.प.सभापती बापूसाहेब येसुगडे यांच्या गटात जोरदार राडा झाला. दोन्ही जमाव आमने-सामने आल्याने वातावणात तणाव निर्माण झाला. दोन्ही जमावांस नियतंत्रणात आणताना पोलिसांना लाटी जार्च करावा लागला, यावेळी पोलिस अधिकारी अनिल शिंदे जखमी झाले. दोन्ही गटाकडून रिव्हाल्वरचा धाक दाखवून, तलवारी काठया, दगडाचा सरास वापर करण्यात आला. या प्रकारामुळे चौक परिसरातील व्यापारी व नागरीकांच्यात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी या दोन्ही गटाविरूध्द फिर्याद दाखल केली आहे. रात्री उशियापर्यत दोन्हीगटातील पंचवीस कार्यकर्त्याना पलूस पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून तलावरी व अनेक हत्यारे जप्त केली आहेत.  

     पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीची नावे अशी- दळवी गटातील विशाल दळवी, युवराज वडार, किरण निकम, विजय जाधव, प्रभाकर कदम, रोहीत दळवी, अनिकेत दळवी, इंद्रजीत भोसले, संतोष मिरजकर, बजरंग माने, केतन शिंदे, विक्रम दळवी, गणेश दळवी असे आहेत. तर येसुगडे गटातील नावे अशी- नारायण निकम, सतिश पाटील, सुनील घोरपडे, मंगेश येसुगडे, संतोष येसुगडे, उदय येसुकडे, संतोष गजानन पाटील, अजय दिवटे, अनिल येसुकडे, सुरेश येसुगडे, भैरू माळी, राजा येसगुडे अशी आहेत. यासर्व आरोपींवर सरकारी कामात अडथळा, दंगल घडविणे यासारखे गुन्हे दाखल केले आहेत.

   सकाळी आकरा वाजता स्वाभिमानी विकास आघाडीचे बापूसाहेब येसुगडे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यासोबत पलूस मधील शिवाजी महाराज पुतळयासमोर ग्रामसभेत झालेल्या प्रकारचा निषेध म्हणून निषेध सभेचे आयोजन केले होते. या सभेत त्यांनी वाट्टेल ते आरोप सुरू केल्याचे वृत्त दळवी गटातील कार्यकर्त्याना समजल्यानंतर आक्रमक झालेल्या गटाने सभेच्या दिशेनशे चाल केली. या गटाच्या कार्यकर्त्याना मानसिंग बँकेसमोर पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला. परंती जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. पोलिसांनी हातातील काटया आडव्या धरून जमावाना रोखले. जमावातील काही आक्रमक कार्यकर्त्यानी त्याचे तोंड बंद करा मग आम्ही जातो. त्याला तेथून हाकला मग आम्ही जातो अशा शब्दात पोलिसांना सांगितले. जमाव मोठा असल्याने पोलिसांचे संख्या कमी असल्याने या जमावास रोखण्यास पोलिसांना अपशय आले.

   तेवढयात समोरून येसुगडे गटातील कार्यकर्त्याची फौज उभा दिसल्याने दळवी गट व येसुगडे गटातील कार्यकर्ते समोरासमोर आल्याने कुणाचा कुणावर अंकुश राहिला नाही. त्यांनी एकमेकांत दिसेल त्याला माहारण सुरू केली. कुणी दगड फेक करीत होते. तर काठया माराहाण झाली. यामध्ये पोलिस अधिकारी अनिल शिंदे यांच्या हाताला दगड लागला. पोलिसांनी लाटीचार्ज केल्यानंतर काही वेळ जमाव बाजूला गेला. परंतु लांब उभा राहून एकमेकांवर दगड मारण्याचा प्रकार सुरू होता. त्यामुळे चौकातील व्यापाऱयांनी दुकाने बंद केली. काही जणांच्या दुचाकी गाडयावर दगड पडल्याने नुकसान झाले आहे. दोन गटातील कार्यकर्त्याची सुमारे एक तास धुमचक्री सुरू होती. दरम्यान या रस्त्यावरील वाहतुक पूर्ण बंद झाली होती. काही वेळ दोन गट एकमेकासमोर आले होते. दोन्ही गटातील कार्यकर्ते इर्षेला पेटून दगड फेक करीत होते. यामध्ये नेत्याची नावे घेवून शिवीगाळ करणारे कार्यकर्ते ही होते. पलूसच्या इतिहासात पहिल्यांदाच सुरू असलेल्या मारामारीचे नागरीकांनी  उंच इमारतीवर जावून मोबाईमध्ये सामावून घेतला. घटनास्थळावर दगडाचा व चपल्लांचा खच पडला होता. पोलिसांनी वाहतुकीसाठी लावलेली ब्रॅकेटस देखील या  मारेकऱयांनी पाडली. पोलिसांना न जुमानता त्याच्याही अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला. पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला असता. त्यांना बाजूला सारून जमाव पुढे सरकत होता. मोठया संख्येच्या जमावापुढे पोलिसांची ताकद कमीच होती. त्यातून देखील पोलिसांनी लाटीजार्च करून जमावास पांगवले. मोठा पोलीस बंदोबस्त दाखल झाल्यानंतर दुपारी दोन्ही गटातील आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी मोहीम राबवली. रात्री उशीरापर्यत पलूस पोलीस ठाण्याच्या आवारात दोन्ही गटातील प्रमुख नेते मंडळींसह त्यांच्या समर्थकांनी तसेच नातेवाईकांनी तळ ठोकला होता. 

                         प्रवाशांचे हाल

पलूस शहरातून जाणाऱया तासगाव-कराड महामार्गवरच गुंडादाजी चौक आहे. या चौकातच दोन्ही गट आमने-सामने आल्याने येथे एस.टी.बसची वाट  पहात बसलेल्या प्रवाशांना मिळेल त्या वाहनांनी नवीन बसस्थानक गाठले. तर वडापच्या जीप गाडया मिनाक्षी सिनेमा टॉकीजजवळ उभ्या केल्या. तासगावरून भरून येणाऱया गाडया पुढे चौकात न जाता काही अंतरावर थांबून होत्या. चौकातील वातावरण निवळल्यानंतर वाहतुक सुरूळीत करण्यात आली.

                पलूस शहरास पोलिस छावणीचे स्वरूप

पलूस शहराच्या इतिहासात पहिल्यांदा एवढया मोठया प्रमाणात मारामारी झाल्याने शहरातून आश्चर्य व्यक्त होत आहे. या माहाणीच्या प्रकार सुरू असताना पोलिसांनी सांगली, तागसाव, कुंडल, भिलवडी या ठिकाणच्या पोलिस ठाण्यातील पोलिसांची फौज मागावली. पलूस शहराच्या चौकाचौकात पोलिसांनी बंदोबस्त दिल्याने पलूस शहरात पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. यामध्ये महिला पोलिसांचाही समावेश होता.

                    पाणी सुटले….वाद पेटला

शहरात पंधरा दिवस पाणी सुटत नाही, या विषयावर ग्रामसभा आयोजीत केली. त्यामध्ये सत्ताधारी व विरोधक यांच्यातील चमकम बुधवारी घडलेल्या धुमश्चक्रीचे कारण आहे. पंधरा दिवस न सुटलेले पाणी बुधवारी सकाळी नळाला पाणी आले.  पाणी या विषयावरूनच हा वाद पेटला आहे. शहरात पाणी सुटले वाद मात्र पेटला.