|Monday, August 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » सर्व तालुका इस्पितळात मिळणार ईएसआयची सेवा

सर्व तालुका इस्पितळात मिळणार ईएसआयची सेवा 

प्रतिनिधी/ बेळगाव

ईएसआयशी संलग्न कामगारवर्गाला आरोग्य सेवांसाठी ईएसआयचे दवाखाने आणि अशोकनगर येथील इस्पितळ वगळता इतर ठिकाणी आरोग्य सेवा मिळत नव्हती. यावर ईएसआय महामंडळ आणि आरोग्य विभागाने एक चांगला पर्याय काढला आहे. आता सर्व तालुका स्तरावरील सर्व सरकारी इस्पितळांमध्ये ईएसआयची सेवा उपलब्ध होणार आहे.

ईएसआय महामंडळाचे कर्नाटक राज्य मुख्य वैद्यकीय आयुक्त डॉ. अशोककुमार भाटीया यांनी तरुण भारतशी बोलताना ही माहिती दिली. बुधवारी ते बेळगावला आले होते. अशोकनगर येथील ईएसआय इस्पितळात जिह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकाऱयांना पाचारण करुन त्यांनी या नव्या योजनेची माहिती दिली. याचबरोबरीने कामगारांना आरोग्य सुविधा पुरवण्यासंदर्भात सूचना करुन त्यांना आवश्यक प्रशिक्षणही दिले.

कामगारवर्ग तुटपुंज्या पगारावर सेवा बजावित असतात. जिह्यातील वेगवेगळय़ा भागातून ईएसआय सुविधेसाठी त्यांना जिल्हा केंद्रावर यावे लागते. यासाठी प्रवास खर्च आणि काम बंद ठेवून नुकसान सोसत त्यांची वाटचाल सुरु आहे. ही बाब ईएसआय महामंडळाच्या निदर्शनास आल्यानंतर आरोग्य खात्याशी संपर्क साधून ही वाढीव सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. प्रत्येक तालुका स्तरीय इस्पितळात आपले ईएसआयचे कार्ड दाखवून कोणतेही शुल्क न भरता मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करुन घेण्याची संधी त्यांना देण्यात आली आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

सर्व कामगारवर्गाने याची दखल घ्यावी तसेच मालकवर्गाने आपल्या कामगारांना याची माहिती करुन द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. ईएसआयच्या इस्पितळातच आल्यावर मोफत उपचार मिळतात हा समज दूर व्हायला हवा. तरच कामगारवर्ग आपापल्या तालुक्मयाच्या ठिकाणी असणाऱया तालुका आरोग्य केंद्रात जाऊन मोफत उपचारांचा लाभ घेऊ शकतील, असे त्यांनी सांगितले.

नव्या डॉक्टरांना तीन वर्षांची सक्ती

 

राज्यातील सर्वच ठिकाणी इएसआय इस्पितळांमध्ये डॉक्टरवर्गाची कमतरता भासू लागली आहे. तज्ञ डॉक्टर वर्ग या इस्पितळांमध्ये काम करण्यास तयार होत नाहीत. यामुळे कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांचे प्रचंड हाल  होवू लागले आहेत. यावर पर्याय म्हणून सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये डॉक्टर होवून बाहेर पडणाऱया प्रत्येक उमेदवाराला किमान तीन वर्षे ईएसआय इस्पितळात काम करण्याची सक्ती केली जाणार आहे, असा प्रस्ताव ईएसआय महामंडळाने राज्य सरकारसमोर सादर केला आहे, असेही त्यांनी सांगितले.

Related posts: