|Monday, December 9, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » मासेमारी बंदी यंदा कडक

मासेमारी बंदी यंदा कडक 

प्रतिनिधी /पणजी :

गेल्या 1 जून ते 31 जुलै 2017 असे एकूण दोन महिने मासेमारी बंदी निश्चित करण्यात आली असून तिची कार्यवाही कडक पद्धतीने करण्याचे मच्छीमारी खात्याने ठरविले आहे. या बंदीचा आदेश खात्याने जारी केला आहे.

मासळीचे उत्पादन वाढावे तसेच त्यांचे प्रजनन होऊन मोठय़ा प्रमाणात वृद्धी व्हावी या हेतूने ही बंदी आखण्यात येते. गोव्यातील किनारपट्टी भागात वरील दोन महिन्यांच्या काळात सर्व प्रकारच्या मासेमारीवर बंदी घालण्यात आली आहे. बंदीमुळे मत्स्य खवय्याची पंचाईत होणार असून त्यांना इतर राज्यांतून येणाऱया मासळीवर किंवा मानशिच्या किंवा सुक्या मासळीवर समाधान मानावे लागणार आहे. अनेक मत्स्यप्रेमी त्यावेळी अंडी, चिकन, मटन यावर तुटून पडतात. तसेच अनेक लोक नदी, नाले व इतर ठिकाणच्या जलाशयात, समुद्रकिनाऱयावर गळ टाकून मासे पकडण्यावर भर देतात.

यांत्रिकी बोटी, ट्रॉलर्स व इतर मासळी उद्योगात मग्न असणारे ओरिसा, तामिळनाडू, कर्नाटक भागातील कामगार या काळात आपापल्या गावी जातात तर बोटी, ट्रॉलर्स नांगरून ठेवण्यात येतात. याच काळात ट्रॉलर्स व अन्य होडय़ांची दुरूस्ती व जाळय़ांचीही डागडुजी करण्यात येते.

Related posts: