|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » तिसऱया मांडवी पुलाचे काम येत्या मार्चपर्यंत पूर्ण होणार

तिसऱया मांडवी पुलाचे काम येत्या मार्चपर्यंत पूर्ण होणार 

प्रतिनिधी /पणजी :

पणजीत मांडवी नदीवरील तिसऱया पुलाचे उद्घाटन मार्च 2018 पर्यंत करण्याच्या दृष्टीने सरकारने प्रयत्न चालविले असून पुलाच्या कामाला गती देण्यात आली आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर या पुलाच्या कामावर लक्ष ठेऊन आहेत. पर्रीकर सरकार सत्तेवर आल्यानंतर कामाची गती बरीच वाढली आहे.

19 डिसेंबर 2017 पर्यंत हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी सरकारने प्रयत्न चालविले होते. तशी सूचनाच कंत्राटदार कंपनीला देण्यात आली होती. मात्र मध्यंतरी कामाची गती मंदावल्याने डिसेंबरपर्यंत काम पूर्ण होणार किंवा नाही याबाबत सांशकता आहे. त्याचबरोबर पुढील महिन्यापासून राज्यात पावसाळा सुरु होत असल्याने त्याचाही परिणाम काही प्रमाणात कामावर होणार आहे. त्यामुळे किमान मार्च 2018 पर्यंत पुलाचे काम पूर्ण करून वाहनांसाठी पूल खुला करता यावा, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पुलाच्या कामावर लक्ष ठेवले असून पुलाच्या कामाचा आढावा ते घेत असतात. सकाळीच अधिकाऱयांना फोन करून ते कामाचा आढावा घेतात. मागील दोन महिन्यात तीन खांबांचे काम गतीने करण्यात आले. पणजीतील वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने हा पूल अत्यंत महत्त्वाचा आहे. मांडवी किनारी भागातील भुसंपादनाबाबतची प्रक्रीयाही पूर्ण झाली असल्याने आता पुलाच्या कामाबाबतचे सर्व अडथळे दूर झाले आहेत.