|Monday, July 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » श्रीलंका दौऱयात मोदींनी पाकवर साधला निशाणा

श्रीलंका दौऱयात मोदींनी पाकवर साधला निशाणा 

‘विद्वेशाचा  पुरस्कर्ता’ म्हणून पाकला संबोधले

वृत्तसंस्था / कोलंबो

श्रीलंकेच्या दौऱयावर असणारे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या खास शैलीत नाव न घेता पाकिस्तानवर चौफेर टीका केली. आपल्या भाषणादरम्यान मोदींनी विद्वेशाचा पुरस्कर्ता’ तसेच ‘चर्चेसाठी राजी नसलेला परंतु मृत्यू तसेच संहारासाठी सदैव तत्पर असलेला देश’ असा पाकिस्तानचा उल्लेख केला.

बुद्धजयंतीच्या पार्श्वभूमीवर बोलताना मोदी यांनी, दीर्घकालीन जागतिक शांतता प्रक्रियेला फक्त दोन देशातील संघर्षापासून नव्हे तर  विद्वेश आणि हिंसाचाराने ग्रस्त बौद्धीक धारणा, विचार श्रृखंला, घटक आणि साहित्यापासून सर्वाधिक धोखा असल्याचे सांगितले. तसेच आपल्या क्षेत्रातील दहशतवादाचा धोका हा संहारक मनोवृत्तीचे प्रकटीकरण आहे.  विद्वेशक विचारसरणी आणि त्यांचे पाठीराख्यांनी चर्चेसाठी आपली द्वारे बंद ठेवत मृत्यू आणि संहारक कार्यासाठी सदैव क्रियाशीलता दर्शवली. अशा तणावपूर्ण आणि हिंसात्मक वातावरणात बौद्ध शिकवण कायमच मार्गदशक ठरणार असल्याचे मोदी यांनी सांगितले.

जगामध्ये सर्वत्र फोफावत असलेल्या हिंसाचाराला संबंधी बौद्ध शांती संदेश हे योग्य उत्तर असल्याचा आपला विश्वास असल्याचे सांगितले. अडीच सहस्र वर्षांहून प्राचीन असले तरीही भगवान बुद्ध यांचा संदेश 21 व्या शतकातही तेवढेच प्रभावी आणि समर्पक असल्याचेही मोदी यांनी सांगितले.