|Saturday, December 15, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली » पंढरपूर पालिका साकारणार सौरउर्जा प्रकल्प

पंढरपूर पालिका साकारणार सौरउर्जा प्रकल्प 

सौरउर्जा प्रकल्प उभारणारी राज्यातील पहीलीच पंढरपूर पालिका

पंढरपूर / संकेत कुलकर्णी

    अपारंपारीक उर्जास्त्रोत वापरावे. असे धोरण सध्या केंद्रांतील नरेंद्र आणि राज्यातील देंवेंद्र सरकारने स्वीकारले आहे. अशाच अपारंपारीक उर्जास्त्रोताचा वापर शासकीय कार्यालयात करावा. असे निर्देशही सरकारने दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व नगरपालिकेत मोठया क्षमतेचा म्हणजेच 3 हजार किलोवॅट क्षमतेचा सौरउर्जा प्रकल्पाचा प्रस्ताव पंढरपूर पालिकेने तयार केला आहे. विशेष म्हणजे सौरउर्जा प्रकल्प येत्या काळात निर्माण करणारी राज्यातील ही पहीलीच नगरपालिका आहे.

      वाढत्या इंधन टंचाईवर मात करण्यासाठी नैसर्गिक स्त्रोताचा वापर करावा. असे धारेण केंद्रांने स्वीकारले. त्यांच्याच पावलावर पाउल टाकत यांची अंमलबजावणी करण्यास सुरूवात केली आहे. पंढरपूर पालिकेने सौरउर्जाचा वापर करण्यांचे ठरविले. यासाठी ऑनग्रीड पध्दतीचे सौरउर्जा वापरणार आहे. सध्या पालिकेला पाणीपुरवठा केंद्र , मलशुध्दीकरण केंद्र , पथदिवे , विधन विहीरी , नपाचे कार्यालय , शाळा ,व इतर इमारती यासाठी जवळपास 36 लाख रूपये वीज बिलापोटी खर्च होतो. हाच खर्च वाचविण्यासाठी सौरउर्जेचा भविष्यात वापर करण्याचा प्रस्ताव पालिकेने तयार केला.

    यासाठी कांसेगाव येथील गट नं 100 येथील कचरा डेपोच्या जागेत या सौरउर्जेचा प्रकल्प कार्यान्वित करण्याचा आराखडा तयार करण्यात येत आहे. या सौरउर्जेच्या माध्यमातून पालिका जवळपास 3 हजार किलोवॅट वीजनिर्मिती करणार आहे. ही तयार झालेली वीज वीज वितरण कंपनीला दिली जाणार आहे. त्यामुळे पालिकेचा दरमहा होणा-या खर्चाची बचत होणार आहे.

      नुकत्याच झालेल्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत सौरउर्जा प्रकल्प निर्मितीचया विषयाला एकमतांने मंजूरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता या प्रकल्पासाठी जागा निश्चिती , आर्थिक धोरण आदि विषयक कामे , आणि त्याला लागणा-या प्रशासकीय मंजु-या घेतल्या जाणार आहेत. ऑनग्रीड पध्दतीने हा प्रकल्प राबविणार आहे. त्यामुळे वीजनिर्मिती झाल्यावर वीजवितरण कंपनीला तयार वीज दिली जाणार आहे. ऑफ्ढग्रीड पध्दतीने सदरचा प्रकल्प तयार केला तर त्याला बॅटरी व इतर खर्च मोठया प्रमाणात झाला असता. तयार झालेली वीज ही संपूर्णपणे वापरावी लागली असती. त्यांच्या देखभालीवरती मोठा खर्च झाला असता. हे सर्व टाळून ऑनग्रीड पध्दतीने प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

   याबाबत एका एजन्सीला हे काम सोपविले जाणार असून ते काम देण्याबाबत मंजूरी घेण्यात येणार आहे. सौरउर्जा बनविण्यासाठी लागणारे पॅनल यांचे आयुर्मान पंचवीस वर्षे आसून ज्या एजन्सीला काम दिले जाणार आहे. त्या एजन्सीने पाच वर्षे संपूर्ण देखभाल या प्रकल्पाची करावी तसेच अनेक सुचना करून प्रस्ताव तयार केला जाणार असल्यांची माहीती पालिकेचे विद्युत अभियंता अविनाश शिंदे यांनी दिली आहे.

   विशेष म्हणजे सदरच्या प्रकल्पाचा श्रीगणेशा हा लवकरच होणार आहे. यासाठी येत्या पंधरा दिवसामधे पालिका सौरउर्जा प्रकल्प निर्मितीची निविदा प्रक्रिया ही प्रसिध्द करणार आहेत. त्यामुळे येत्या काळात पालिकेला स्वतःच्या मालकींची वीज यानिमित्ताने निर्माण होणार आहे.

चौकटित –

 सौरउर्जेच्या माध्यमातून वीजनिर्मिती करण्याचा प्रस्ताव पालिकेचा आहे. साधारणतः हा प्रकल्प पूर्ण होईल. या प्रकल्पासाठी कोटयावधी रूपयांचा निधी खर्ची पडणार आहे. याकामी केंद्र व राज्य सरकारच्या योजनेचा लाभ घेतला जाणार आहे. त्यामुळे भविष्यात पालिकेच्या सर्व इमारती व प्रकल्पे हे स्वयंपूर्ण होतील.

Related posts: