|Thursday, October 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » भाजी मार्केटमध्ये राबतानाच त्याने केले यशाचे मंथन…..

भाजी मार्केटमध्ये राबतानाच त्याने केले यशाचे मंथन….. 

बेळगाव / प्रतिनिधी

घरची हलाखीची परिस्थिती, वडील सहावीत असतानाच गेले, आईने अंगणवाडीमध्ये सेविका म्हणून सेवा बजावत त्याच्या शिक्षणाची धुरा सांभाळली, पुढील वर्षीचा शैक्षणिक खर्च भरण्यासाठी तो सुटीच्या कालावधीत भाजी मार्केटमध्ये कामाला जात असे. मात्र कोणत्याही खासगी शिकवणीला न जाता त्याने दहावीमध्ये तब्बल 601 म्हणजेच 97 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाला. आणि आपल्या आईचे स्वप्न सत्यात उतरविले…..

मराठा मंडळ सेंट्रल हायस्कूलमध्ये शिकणाऱया मंथन अनिल कणबरकर याची ही यशपूर्ण कहाणी. मंथनने मराठा मंडळ सेन्ट्रल स्कूलमध्ये प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. आपला पहिला क्रमांक येईल, असे त्याला कधीच वाटले नव्हते त्यामुळे शुक्रवारी निकाल असूनही तो भाजीमार्केटमध्ये नेहमीप्रमाणे कामाला गेला होता. काम करून आपल्या घरासाठी तो पैसे जमवत होता. निकाल लागल्यानंतर तो पहिला आल्याचे समजताच शिक्षकवर्ग त्याला शोधण्यासाठी कामावर व नंतर त्याच्या घरी गेले होते. इतके मोठे यश मिळवूनही त्याच्या चेहऱयावर त्याचा लवलेशही नव्हता. आईने आनंदाने भरलेल्या डोळय़ांनी पेढा भरविला हे पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले. 

त्याने मराठीत 117, इंग्रजीत 99, कन्नडमध्ये 95, गणितमध्ये 96, विज्ञानमध्ये 96, समाज विज्ञान विषयात 98 गुण मिळविले आहेत. होसूर शहापूर येथील आपल्या छोटय़ाशा घरात तो अभ्यास करीत असे. भाजी मार्केटमध्ये बर्डे यांच्या दुकानात तो कामाला होता. मंदीरा ही त्याची जुळी बहिणही त्याच्यासोबत दहावीला होती. तिला 76 टक्के गुण मिळाले आहेत. मंथनचा मोठा भाऊही कामाला जावून घराच्या कुटुंबाला साहाय्य करतो.

सेन्ट्रल स्कूलमध्येच प्रवेश घेण्यासाठी त्याने सातवीमध्ये असताना सुटीमध्ये कामाला जावून पैसे जमा केले होते. त्या पैशातून त्याने शाळेमध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर  तो सकाळी काहीवेळ काम व त्यानंतर काहीवेळ अभ्यास असा त्याचा दिनक्रम असायचा. 

तरुण भारतच्या ‘यशवंत व्हा’ ची मोलाची मदत

तरुण भारतने खास दहावीच्या मुलांसाठी सुरू केलेल्या ‘यशवंत व्हा’ या पुस्तिकेची अभ्यासात खूच मदत झाली. एखादा मुद्दा समजण्यासाठी याची खूप मदत होत होती. त्यासाठी सर्व अंक एकत्रित बायडिंग करून घेतले होते. एखाद्या वेळेस अंक न मिळाल्यास मुख्याध्यापक व्ही. ए. हसबे स्वतः अंक विद्यार्थ्यांना देत असल्याचे मंथनने आवर्जून सांगितले

Related posts: