|Sunday, January 21, 2018
You are here: Home » Top News » पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन ; 2 जणांचा मृत्यू

पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन ; 2 जणांचा मृत्यू 

ऑनलाईन टीम / श्रीनगर :

गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत आहे. तसेच आज जम्मू-काश्मीरमधील नौशेरा सेक्टरमध्ये गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात दोन जणांचा मृत्यू झाला असून, तीन जण जखमी असल्याची माहिती मिळत आहे.

आज सकाळीपासून नौशेरा परिसरातील कलसिया भागात पाकिस्तानने तोफांचा मारा सुरु केला. या तोफमाऱयाला भारतीय लष्करातील जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले. या दरम्यान दोन नागरिकांचा मृत्यू झाला असून, तीन जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Related posts: