|Saturday, January 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » मुख्यमंत्री सोलापुरात स्वागतापुरते

मुख्यमंत्री सोलापुरात स्वागतापुरते 

सोलापुर / वार्ताहर

 उस्मानाबाद जिल्हयातील शेततळयांच्या कामांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापुरातुन उस्मानाबादकडे रवाना झाले. त्यासाठी सोलापुरात आल्यानंतर पालकमंत्री विजयकुमार देशमुख, भाजपच्या पदा]िधकारी आणि अधिकाऱयांनी त्यांचे स्वागत केले.

 सोलापुर विमानतळावर मुख्यमंत्री आल्यानंतर सोलापुर विमानतळावर 10 च्या सुमारास मुंबईहुन मुख्यमंत्र्यांचे आगमन झाले. यावेळी उपस्थित सहकारमंत्री सुभाष देशमुख,महापौर शोभा बनशेट्टी, उपमहापौर शशिकला बत्तुल, भाजप जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, शहराध्यक्ष अशोक निंबर्गी, महापालिका सभागृह नेते सुरेश पाटील, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, पालिका आयुक्त अविनाश ढाकणे, पोलिस आयुक्त महादेव तांबाडे, बार्शीचे भाजप नेते राजेंद्र मिरगणे यांनी स्वागत केले.

 स्वागतानंतर उस्मानाबादकडे जाणाऱया हेलिकॉप्टरमधुन पुढील नोयिजित दौऱयाकदे ते रवाने झाले. यावेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख मुख्यमंत्र्यांसमवेत होते. केवळ विमान बदलापुरतेच मुख्यमंत्री सोलापुरात होते.

Related posts: