|Sunday, October 21, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » बलात्कारविरोधी निदर्शनात ‘बलात्कारी’च सहभागी

बलात्कारविरोधी निदर्शनात ‘बलात्कारी’च सहभागी 

पीडितेने गर्दीतून आरोपीला ओळखले

वृत्तसंस्था/ हावडा

पश्चिम बंगालमध्ये एका महिलेने तिच्यावर बलात्कार करणाऱया व्यक्तीला निदर्शन करत असलेल्या जमावातून पकडविले आहे. प्रत्यक्षात हा जमाव तिच्यावर झालेल्या बलात्कारानंतर सुरक्षा व्यवस्थेवरून निदर्शन करत होता. हावडा येथे राहणारी एक महिला शुक्रवारी मध्यरात्री बलात्कार आणि मारहाणीची शिकार ठरली होती.

पीडित महिलेनुसार घटनेच्या रात्री जवळपास अडीच वाजता एका व्यक्तीने तिच्या घराचा दरवाजा ठोठावला. महिलेने आतूनच बाहेर कोण आहे अशी विचारणा केली असता त्या व्यक्तीने आपल्याला काही काम असल्याचे सांगितले. यानंतरही महिलेने दरवाजा उघडण्यास नकार देत परत झोपायला जाणे पसंत केले.

त्यानंतर अचानक मला काहीतरी तोडल्याचा आवाज ऐकू आला. तो व्यक्ती दरवाजा तोडून आत आला होता. मी काही करण्याच्या आधीच त्याने मला पकडले. त्याने मला ओरडल्यास जीवे मारीन अशी धमकी दिली. यानंतर त्याने माझ्यावर बलात्कार केला. जेव्हा मी ओरडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याने सातत्याने माझ्यावर ठोसे लगावले असे महिलेने पोलिसांना सांगितले.

 आरोपीने सकाळी साडेपाच वाजता तिचे केस ओढत खेचत बाहेर आणले. जेथे बेशुद्धीच्या अवस्थेत आरोपी तिला सोडून निघून गेला. जेव्हा पीडितेला रुग्णालयात नेले जात होते, तेव्हा तिने निदर्शन करत असलेल्या जमावात तिच्यावर बलात्कार करणारा आरोपी असल्याचे दिसून आले. याची माहिती तिने पोलिसांना दिली, ज्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. पोलिसांनी आरोपीविरोधात बलात्कार आणि मारहाणीचा गुन्हा नोंदविला आहे.

Related posts: