|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » विज्ञानाची मूलतत्त्वे शाश्वततेच्या विकासावर आधारित

विज्ञानाची मूलतत्त्वे शाश्वततेच्या विकासावर आधारित 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मत

पुणे / प्रतिनिधी

आपल्या विज्ञानाची मूलतत्त्वे शाश्वततेच्या विकासावर आधारित असून, आता ही सूत्रे आधुनिक युगाला उमगली आहेत. आपल्या ज्ञानाचा आणि शाश्वततेचा भाग आपण ज्यावेळी विज्ञानाला जोडू त्यावेळी खऱया अर्थाने जगाची प्रगती होईल. असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे व्यक्त केले.

भारतीय ज्ञानाचा खजिना हे प्रशांत पोळ लिखीत पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मूर्तीशास्त्राचे गाढे अभ्यासक डॉ. गो. ब. देगलूकर, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, स्नेहल प्रकाशनचे रविंद्र घाटपांडे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, आपल्याला पाश्चिमात्यांकडून ज्ञान आले, असे आपल्याकडील लोकांना वाटते. पण सर्व विषयात पूर्वीपासूनच भारत किती समृद्ध होता ते हे पुस्तक वाचल्यावर कळते. आपल्या देशात विविध गोष्टींत आपण किती पुढारलेले होते ते स्पष्ट होते. हे पुस्तक वाचून आपला देशाबद्दलचा अभिमान आणि स्वाभिमान नक्की जागा होईल. पण इतिहासाकरिता आपण जगायचे नाही. त्यातून प्रेरणा घेऊन पुढे जायचे. आपल्या विज्ञानाची मूलतत्त्वे शाश्वततेवर आधारित आहे. हे शाश्वत युगाला आजच कळाले आहे. आमच्या ज्ञानातील शाश्वततेचा भाग विज्ञानाला जोडून खऱया अर्थाने जगाची प्रगती करता येऊ शकेल. महाराष्ट्र शासनाच्या वतीने मी स्वतः शिक्षणमंत्र्यांशी बोलून हे पुस्तक सर्व ग्रंथालयात जावे, असे सांगणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

लेखक प्रशांत पोळ यांनी त्यांच्या भाषणात बोलताना एक किल्ली आपली आणि एक दैवाची हे सूत्र सांगितले. या दोन्ही किल्ल्या एकाचवेळी कुलुपाला लागल्या तर कुलुप लगेच उघडते. याचा आधार घेत मुख्यमंत्री म्हणाले, आम्हा राजकारणी लोकांसाठी हे सूत्र फार महत्त्वाचे आहे. ज्यावेळी दोन्ही किल्ल्या कुलुपाला लागतात त्यावेळीच कुलुप उघडते. हे सूत्र निवडणुकीचे तिकिट मिळविणाऱयांसाठी फार महत्त्वाचे आहे. असा टोला मुख्यमंत्र्यांनी तिकिट मागणाऱयांना यावेळी या माध्यमातून लगावला.

डॉ. देगलूकर म्हणाले, जे तुम्ही कराल ते ज्ञानाधिष्ठीत असावे. शिवाजी महाराजांसारख्या अनेक रत्नांचे इतिहास आपल्याकडे पुढे न आणता कोणा येडय़ा गबाळ्या लोकांवर पानेच्या पाने लिहिली जातात. हे दुर्दैव आहे. आपल्या संस्कृतीत सामर्थ्य आहे. पण आता आपण जुन्या गोष्टी सांगायला लागलो तर लोक आपल्याला सनातनी म्हणातात. भारतात भारतीयांचे कर्तृत्त्व मोठे आहे. या पद्धतीची पुस्तके ही आपल्याकडील मंत्र्यांमध्ये वाचन प्रवृत्ती निर्माण करतील.

Related posts: