|Saturday, November 17, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » मिश्रा यांनी उपोषण सोडले

मिश्रा यांनी उपोषण सोडले 

केजरीवाल यांच्याविरोधात आज सीबीआयला देणार पुरावे

 वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दिल्लीचे माजी जलसंपदा मंत्री कपिल मिश्रा यांनी सोमवारी म्हणजेच 6 व्या दिवशी आपले उपोषण सोडले आहे. मिश्रा आता मंगळवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधातील पुरावे सीबीआयकडे सोपविणार आहेत. रविवारी पत्रकार परिषदेत केजरीवाल यांच्याविरोधात मांडलेले सर्व दस्तऐवज मिश्रा सीबीआयला सोपवतील. माजी मंत्र्याने आम आदमी पक्षावर अनेक गंभीर आरोप केले आहेत.

मिश्रा यांनी रुग्णालयात डॉक्टरांच्या उपस्थितीत उपोषण सोडले. मंगळवारी सकाळी 11 वाजता सीबीआय, सीबीडीटी कार्यालयात जाऊत तक्रार करेन. जे लोक थट्टा करत आहेत, त्यांना 5 दिवसानंतर रुग्णालयात आलो हे सांगू इच्छितो. केजरीवाल खोकल्यासाठी 15 दिवसांकरता रुग्णालयात जातात. केजरीवाल सध्या पडद्यामागे लपून बसले असून पत्नीला समोर आणत आहेत असा आरोपही त्यांनी केला.

केजरीवाल यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करणारे दिल्ली मंत्रिमंडळाचे माजी मंत्री मिश्रा रविवारी पत्रकार परिषदेदरम्यान बेशुद्ध झाले होते. त्यांनी आम आदमी पक्षाला विदेशातून मिळालेल्या देणगीपासून नेत्यांच्या विदेश दौऱयाबाबत प्रश्न उपस्थित केले होते. बनावट कंपन्या आणि लोकांच्या माध्यमातून पक्षाने देणगी जमा केल्याचा दावा मिश्रा यांनी केला होता.

केजरीवालांच्या पत्नीचीही वादात उडी

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांनी मिश्रा यांना केलेल्या खोटय़ा आरोपांचे परिणाम भोगावे लागतील असे म्हटले आहे. निसर्गाचा कायदा कधीच मोडत नाही, विश्वासघाताचे बीज, खोटय़ा आरोपांच्या पेरणीचे फळ त्यांना (कपिल मिश्रा) टाळता येणार नाही असे सुनीता यांनी ट्विट करत सांगितले आहे. यावर मिश्रा यांनी सुनीता यांना त्यांच्याच घरातील कटांची माहिती नसावी असे वक्तव्य केले.

Related posts: