|Thursday, October 18, 2018
You are here: Home » मनोरंजन » रोहित शेट्टी करणार मराठी चित्रपटाची निर्मिती

रोहित शेट्टी करणार मराठी चित्रपटाची निर्मिती 

ऑनलाईन टीम / मुंबई :

रोहित शेट्टीने बॉलिवूडमध्ये हिट चित्रपट दिले आहे. आता रोहित बॉलिवूडनंतर मराठी चित्रपटांची निर्मिती करण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे.

शाहरूख खान आणि रोहित शेट्टी एकत्र मिळून मराठी चित्रपट बनवणार असल्याचे म्हटले जात आहे. रोहित सध्या ‘गोलमाल’या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. तसेच रोहित सध्या ‘खतरों के खिलाडी’या कार्यक्रमात व्यग्र आहे. तो संपल्यावर या वर्षाच्या अखेरिस तो त्याच्या मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात करणार आहे आणि ही बातमी त्याने स्वतः सांगितले आहे. यावेळी बोलताना रोहित म्हणाला, ‘मी मराठी चित्रपटाची निर्मिती करणार असल्याची बातमी खरी आहे. सध्या माझे चित्रपटाच्या पटकथेवर काम सुरू आहे. लवकरात लवकर या चित्रपटाच्या पटकथेवरील काम पूर्ण होईल असे मला वाटत आहे.

 

Related posts: