|Thursday, May 23, 2019
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

मेष

रवि मंगळ युतीमुळे प्राप्ती आणि खर्च यांचा मेळ बसणे कठीण होईल. कुणाचे तरी कर्ज फेडण्याची पाळी येईल. मौल्यवान वस्तुंची खरेदी होईल. निष्काळजीपणामुळे महत्त्वाची कामे अडण्याची शक्मयता, पण या योगावर एखादे न होणारे कामही होऊन जाईल. खोडसाळपणा व मोबाईलचा  गैरवापर टाळण्याचा प्रयत्न करा.


वृषभ

आर्थिक स्थिती उत्तम राहील. जमीन जुमला खरेदीचे योग दूरवरचे प्रवास घडतील. रवि, मंगळ तुमच्या राशीतच असल्याने विक्षिप्त स्वभाव असलेल्या व्यक्तिशी मतभेद होण्याची शक्मयता. कर्तव्य पालनाकडे विशेष लक्ष द्याल. बदली बढतीसाठी प्रयत्न केला असेल तर त्यात यश मिळेल. राजकारणाशी संबंध येईल. पण त्यातून काही फायदा होणार नाही. अग्नि व विजेची उपकरणे जपून हाताळा.


मिथुन

राशिस्वामी लाभात हर्षलने युक्त आहे. ज्या क्षेत्रात असाल त्यात मोठे यश व आर्थिक फायदा होईल. लोकप्रियता लाभेल. काटकसरीचे काही मार्ग अमलात आणाल. त्यामुळे हाती पैसा टिकू लागेल. नोकरीत उच्चस्थान मिळण्याची शक्मयता. रवि, मंगळ बाराव्या स्थनी शत्रूपिडा निर्माण होईल. कोणाशीही बोलताना वागताना प्रसंगावधान ठेवा. मंगळाच्या अंमलाखाली वस्तू खरेदी करणे शक्मयतो टाळा.


कर्क

भाग्यस्थ शुक्रामुळे संगीत, नाटय़, चित्रपट क्षेत्राशी संबंधीत असाल तर त्यात यश मिळेल. ऐपत असेल तर एखादा कारखानाही सुरू होईल. कोणत्याही व्यवसायात अपेक्षित पेक्षा अधिक नफा होईल. लाभस्थ रवि मंगळामुळे मित्र मैत्रिणीकडून फसगत. बुधाचे भ्रमण परिस्थितीला अचानक कलाटणी देईल. महत्त्वाची कागदपत्रे जपून हाताळा. खासगी गुप्त गोष्टींची कोठेही वाच्यता करू नका.


सिंह

रवि, मंगळ दशमात हा अत्यंत शुभयोग आहे. उच्चपद प्राप्ती, एखादी संस्था किंवा कारखान्याची उभारणी करू शकाल. वडिलोपार्जित इस्टेट असेल तर ती मिळेल. परदेश गमनाची संधी येईल. उच्चदर्जा प्राप्त होईल. कोणतेही सरकारी काम अडले असेल तर ते पूर्ण होईल. अष्टमस्थ उच्च शुक्रामुळे अचानक धनलाभाची शक्मयता. हरविलेली वस्तू पुन्हा परत मिळेल.


कन्या

सप्तमातील उच्च शुक्रामुळे वैवाहिक जवनात शुभ घटना. मानसिक सौख्य, ताणतणाव कमी होईल. रवि, मंगळ भाग्यात  हा योग किरकोळ कारणावरून मोठे वादंग माजविल. साध्या सुध्या बोलण्यातून गैरसमज निर्माण होतील. धार्मिक बाबतीत अतिरेक होण्याची शक्मयता. सरकारी क्षेत्र व परदेशाला संबंधीत व्यवहाराला उत्तम यश मिळेल. अष्टमस्थ बुध, हर्षल अपघात दर्शवित असल्याने गाडी चालविताना निष्काळजी राहू नका.


तुळ

राशिस्वामी शुक्र बलवान असल्याने आरोग्य चांगले राहील. विवाहासाठी स्थळे आल्यास नाकारू नका. आर्थिक स्थिती भक्कम राहिल. गुरुचे भ्रमण आध्यात्मिक बाबतीत शुभ आहे. पण नको त्या गुरु किंवा योग्यांच्या मागे लागू नका. रवि, मंगळाचे भ्रमण शुभ नाही. सर्व तऱहेच्या अपघातापासून जपा. पण  वारसाहक्काने गाडी, बंगला, घर मिळण्याचे योग दिसतात.


वृश्चिक

राशिस्वामी मंगळ सप्तमात रविने युक्त आहे. वैवाहिक जीवनात मतभेदाला स्थान देऊ नका. तसेच जवळचा अथवा लांबचा प्रवास असो वाहन पूर्ण तपासून घ्या. पंचमातील शुक्रामुळे चैनीवृत्ती वाढेल. पैसाही बऱयापैकी मिळेल. शिक्षणात नावलौकीक संतती झाल्यास हुषार व देखणी असेल. अचानक धनलाभाच्या दृष्टीने अनुकूल योग. नोकरीत समाधानकारक वातावरण राहील.


धनु

राशिस्वामी गुरु दशमात आहे. कितीही अडचणी आल्यातरी  त्यातून सहिसलामत बाहेर पडाल. साडेसाती व इतर कुयोगाचा प्रभाव जाणवणार नाही. बलवान शुक्रामुळे स्वत:ची इस्टेट, वाहन, घरदार होण्याचे योग. कौटुंबिक जीवन सुखी व समाधान राहिल. रवि, मंगळाचे भ्रमण सर्व बाबतीत अनुकूल आहे. नोकरीत असाल तर उच्च अधिकार मिळवाल. शेती बागायतीपासून फायदा.हर्षल  बुधामुळे  संशोधनात्मक कार्यात यश.


मकर

राशिस्वामी शनि कडक नक्षत्रात आहे. त्यामुळे वाहन जपून चालवा. जुन्या पुराण्या वस्तू खरेदी करू नका. कोणालाही कर्जासाठी जामिन राहू नका. रवि, मंगळ पंचमात काही बाबतीत जपून रहावे लागेल. चतुर्थातील बुध हर्षल स्थलांतर दर्शवित असल्याने नोकरीत बदलीसाठी प्रयत्न करा. शुक्राचे भ्रमण काही बाबतीत शुभफलदायी आहे. शुभकामासाठी प्रवास, भावंडाचे सौख्य उत्तम.


कुंभ

 धनस्थानातील शुभ शुक्रामुळे  पांढऱया व निळय़ा रंगाची वस्तू खरेदी कराल. आर्थिक स्थिती उत्तम राहिल. डोळय़ांचे विकार कमी होतील. मंगळ, रवि योगामुळे कौंटुंबिक वातावरण  नरम गरम राहील. वास्तुविषयक कोणतेही व्यवहार यशस्वी होतील. रशिस्वामी शुभ असल्याने एखादा बंद पडलेला व्यवसाय पुन्हा सुरू करू शकाल. तसेच हरविलेल्या व्यक्ती अथवा वस्तू परत मिळण्याची शक्मयता.


मीन

राशिस्वामी गुरु सप्तमात आहे. भागिदारी व्यवसाय भाऊबंदकी व दूरचे प्रवास या दृष्टीने शुभ. आरोग्य उत्तम राहील. मनातील अनेक महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. कर्तबगारीला वाव मिळेल. दागदागिने, वस्त्रप्रावरणांची  खरेदी होईल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. हातून चांगले कार्य होईल. बुध हर्षल योगामुळे अविचाराने पैसे अथवा महत्त्वाच्या चिज वस्तू हरवतील, काळजी घ्या. रवि, मंगळाचे उत्तम सहकार्य उत्साह वाढेल.

 

Related posts: