|Thursday, November 15, 2018
You are here: Home » उद्योग » आयसीआयसीआय, एचडीएफसी बँकेकडून गृहकर्ज व्याजदरात कपात

आयसीआयसीआय, एचडीएफसी बँकेकडून गृहकर्ज व्याजदरात कपात 

मुंबई :

 आयसीआयसीआय आणि एचडीएफसी या खासगी क्षेत्रातील प्रमुख बँकांकडून गृहकर्ज व्याजदरात कपात करण्यात आली आहे. दोन्ही बँकांनी गृहकर्ज व्याजदर 0.30 टक्क्यांनी कमी केला आहे. आता 30 लाख रुपयांपर्यंतचे गृहकर्ज 8.40 टक्क्यांनी मिळणार आहे. महिलांसाठी या कर्जाचा दर 8.35 टक्के असेल. परवडणाऱया घर घेणाऱया लोकांसाठी या नवीन कपातीचा लाभ घेता येईल. यापूर्वी एसबीआय या सरकारी मालकीच्या बँकेने व्याजदरात कपात केली आहे. सरकार परवडणाऱया गृह प्रकल्प योजनेनुसार 6.50 टक्क्यांनी व्याजदरावर अनुदान देत आहे. पतधोरण बैठकीत आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेल यांनी बँकांना व्याजदार कपात करण्याचे आदेश दिले होते. गेल्या दोन वर्षात आरबीआयने रेपो दरात 1.50 टक्क्यांनी कपात केली.

Related posts: