|Tuesday, March 26, 2019
You are here: Home » क्रिडा » भारतीय महिला हॉकी संघ सलग दुसऱया सामन्यात पराभूत

भारतीय महिला हॉकी संघ सलग दुसऱया सामन्यात पराभूत 

वृत्तसंस्था/ प्युकेकोह (न्यूझीलंड)

येथे न्यूझीलंडविरुद्ध सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या हॉकी स्पर्धेतील दुसऱया लढतीतही भारतीय महिला हॉकी संघाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. मंगळवारी झालेल्या या लढतीत यजमान किवीज संघाने भारताचा 8-2 असा धुव्वा उडवला. या शानदार विजयासह किवीज संघाने मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. भारतातर्फे लिलिमा मिंझ व अनुपा बार्ला यांनाच गोल नोंदवता आला. न्यूझीलंडतर्फे स्टेकी मिक्sलसनने तीन, समंथा हॅरिसनने दोन तर ख्रिस्टिन पिअर्स, मॅडिसन डोर व स्टेफनी डिकन्सने प्रत्येकी एक गोल केला. याआधी सलामीच्या लढतीत भारतीय संघ यजमान संघाकडून 4-1 अशा फरकाने पराभूत झाला होता. 

सामन्यात प्रारंभापासूनच आक्रमक खेळणाऱया न्यूझीलंडने शेवटपर्यंत भारतीय संघाला वरचढ होण्याची संधीच दिली नाही. तिसऱयाच मिनिटाला संमथा हॅरिसनने मैदानी गोल करत न्यूझीलंडला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर, दुसऱया सत्रात स्टेकी मिक्sलसनने 21 व 30 व्या मिनिटाला शानदार गोल नोंदवताना संघाची आघाडी 3-0 ने वाढवली. पहिल्या दोन सत्रात गोल करण्यात अपयश आल्यानंतर तिसऱया सत्रात लिलिमा मिंझने 40 व्या मिनिटाला गोल करताना भारताला पहिले यश मिळवून दिले. पण, भारतीय संघाचा हा आनंद फार काळ टिकला नाही. लगेचच 42 व्या मिनिटाला स्टेकी मिक्sलसनने वैयक्तिक तिसरा व संघाचा चौथा गोल नोंदवताना आघाडी 4-1 ने वाढवली.

चौथ्या सत्रात अनुपा बार्लाने 49 व्या मिनिटाला गोल करत भारताची आघाडी 4-2 ने कमी केली. यानंतर, सामना संपण्यास 11 मिनिटे बाकी असताना ख्रिस्टिन पिअर्स (52 वे मिनिट), मॅडिसन डोर (56 वे मिनिट), समंथा हॅरिसन (56 वे मिनिट), स्टेफनी डिकिन्स (60 वे मिनिट) यांनी चार गोल करताना न्यूझीलंडला 8-2 असा धमाकेदार विजय मिळवून दिला. या विजयासह यजमान किवीज संघाचे पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. उभय संघातील तिसरी लढत दि. 17 रोजी होणार आहे.

Related posts: