|Sunday, May 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » कोकण रेल्वेची 28 स्थानकांवर अमर्याद वायफाय सेवा

कोकण रेल्वेची 28 स्थानकांवर अमर्याद वायफाय सेवा 

प्रतिनिधी/ रत्नागिरी

कोकण रेल्वेच्या 28 स्थानकांवर 2 एमबीपीएस वेगाने मोफत वायफाय सुविधा पुरवण्याची घोषणा करण्यात आली आहे.

कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी एल. के. वर्मा यांनी काढलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, स्थानकांच्या प्रवेशद्वार आणि परिसरात ही सेवा मिळेल. जॉयस्पॉट ऍपद्वारे ग्राहकांना त्याची नोंदणी करावी लागेल. अमर्याद, मोफत वायफाय सेवा कोलाड ते मडुरे दरम्याने येणाऱया सर्व स्थानकांवर उपलब्ध राहणार आहे. एकावेळी 300 ग्राहकांना सेवा देण्याची क्षमता या यंत्रणेत आहे तर लहान स्थानकांवर 100 प्रवाशांना ही सेवा एकाचवेळी उपलब्ध होऊ शकणार आहे. गाडीची वाट पाहताना त्यांचा वेळ उत्पादक कामात घालवता यावा, यासाठी ही सेवा देण्यात आली आहे. त्यासाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचे विशेष प्रयत्न आहेत. ही सेवा 24 तास उपलब्ध राहणार आहे.

 

Related posts: