|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » पेट्रोल-डिझेल दरकपातीने तूर्तास दिलासा

पेट्रोल-डिझेल दरकपातीने तूर्तास दिलासा 

बेळगाव  / प्रतिनिधी

वाढत्या महागाईने नागरिक होरपळून निघत आहेत. परंतु सोमवारी मध्यरात्रीपासून पेट्रोल व डिझेलच्या दरकपातीने नागरिकांना महागाईपासून तूर्तास तरी दिलासा मिळाला आहे. मंगळवारपासून शहरात पेट्रोल 69.96 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 58.66 रुपये प्रतिलिटर दराने विक्री केले जात आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोलचा प्रतिबॅरल दर घसरल्याने व डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्याने दरामध्ये कपात करण्यात आली आहे. पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 2.05 रुपये तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर 2.13 रुपये कपात करण्यात आली आहे. यामुळे सध्याच्या वाढत्या महागाईमध्ये ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

30 एप्रिलला मागील दरवाढ करण्यात आली. वाढत्या उन्हाच्या झळांबरोबरच महागाईच्या झळाही तीव्र झाल्या आहेत. त्यामध्ये पेट्रोल व डिझेल दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढतो. त्याचा परिणाम उत्पादनाच्या दरवाढीवर होतो. याचा फटका सर्वसामान्यांना सहन करावा लागतो.