|Tuesday, December 18, 2018
You are here: Home » Top News » सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. नितीन करमाळकर

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. नितीन करमाळकर 

ऑनलाईन टीम / पुणे :

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदी विद्यापीठातील पर्यावरणशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. नितीन करमाळकर यांची बुधवारी निवड करण्यात आली.

कुलगुरूपदाच्या अंतिम मुलाखती मंगळवारी राजभवनात पार पडल्या. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी या उमदेवारांच्या मुलाखती घेतल्या. राज्यपालांकडून कुलगुरूपदी कुणाची निवड केली जाते आणि राजभवनातून त्याची घोषणा केव्हा होते याकडे सगळयांचे लक्ष लागले होते. विद्यापीठातील आरोग्य विज्ञान विभागाचे प्राध्यापक डॉ. भूषण पटवर्धन, भौतिकशास्त्र विभागाच्या प्रमुख अंजली क्षीरसागर, पर्यावरणशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. एन. आर. करमळकर, मुंबईच्या रूईया कॉलेजचे प्राचार्य सुहास पेडणेकर, मुंबईच्या रसायनशास्त्र तंत्रज्ञान संस्थेचे प्राध्यापक डॉ. ए. बी. पंडित यांनी मंगळवारी मुलाखती दिल्या होत्या.

राज्यपालांनी प्रत्येक उमेदवाराला मुलाखतीसाठी दहा मिनिटांचा वेळ दिला होता. विद्यापीठाच्या विकासाबाबत तुमचे व्हिजन काय ? अशी विचारणा राज्यपालांकडून उमेदवारांना करण्यात आली होती. विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांचा कार्यकाळ सोमवारी समाप्त झाला. त्यानंतर शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू देवानंद शिंदे यांच्याकडे अतिरिक्त पदभार सोपवण्यात आला होता.

Related posts: