|Thursday, October 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » स्थायीमध्ये ऐनवेळच्या विषयावरुन जोरदार खल

स्थायीमध्ये ऐनवेळच्या विषयावरुन जोरदार खल 

प्रतिनिधी / सातारा

स्थायी समितीची सभा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्या सभेत विषयपत्रिकेवरील सहा विषयांबरोबर ऐनवेळच्या विषयावर जोरदार खल झाला. ऐनवेळच्या विषयांमध्ये प्रतापसिंह हायस्कूलवरुन जिल्हा परिषद प्रशासनाचे वाभाडे निघत असल्याने अध्यक्ष संजीवराजे यांनी स्वतंत्र बैठक घेत लगेच प्रतापसिंह हायस्कूलला भेट देण्याचा निर्णय घेतला. हायस्कूलची पाहणी केल्यानंतर त्यांचे मन हेलावले. यावेळी स्थायी समितीच्या सभेला सर्व सदस्य उपस्थित होते.

विषय पत्रिकेवरील जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्राम विकास निधीतून रक्कम 12 कोटी 45 लाख 93 हजार 999 ची व्याजासह अनुज्ञेय होणारी रक्कम 13 कोटी 54 लाख 95 हजार 974 पूर्णगुंतवणूक करण्याच्या विषयाला मंजूरी देण्यात आली. सामान्य प्रशासन विभाग 1 व 2 मधील लेखा विषयक नोंदवह्यांचे अवलोकन करण्यात आले. नांदवळ (ता. कोरेगाव) येथील पाझर तलावाच्या दुरुस्तीबाबत आलेल्या निविदेवर मान्यता देण्यात आली. लघु पाटबंधारे विभागाकडील ठेकेदारांनी भरलेली रक्कम 6 लाख 57 हजार 950 रुपयांच्या व्यापगत झाल्याने जिल्हा निधीतून काढून त्या ठेकेदारांना अदा करण्याचा विषयही मंजूर करण्यात आला.

ऐनवेळच्या विषयामध्ये सज्जनगड पोहच रस्ता करण्याचा विषय घेण्यात आला. तसेच जिल्हा परिषदेच्या विस्तारीत इमारतीमधील खोल्या भाडय़ाने दिल्या आहेत. त्याचे सुधारित दराने भाडे आकारणी करण्याचा विषय मंजूर करण्यात आला. त्यामध्ये सातारा जिल्हा परिषदेच्या विस्तारित इमारतीअंतर्गत 14 कार्यालये भाडे तत्वावर कार्यरत आहेत. 1992-93 मध्ये प्रति चौरस किलोमीटर 33.15 दर आकारण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचा तोटा होत आहे. सुधारित भोडवाड करण्यात यावी, 112.00 चौरस मीटर तर 10.40  चौरसफुट या दराने निश्चित आकारणी करण्यात यावी, असा विषय मंजूर केला गेला.

‘तरुण भारत’च्या वृत्ताची घेतली दखल

ज्या शाळेत घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे शिकले. ती शाळा प्रतापसिंह हायस्कूल सध्या दयनीय अवस्थेत आहे. या शाळेबाबत वस्तुस्थिती दैनिक ‘तरुण भारत’ने मांडली होती. तसेच शिवांतिका सामाजिक शैक्षणिक संस्थेचे गणेश दुबळे, अमित शिंदे, विश्व हिंदू परिषदेचे जितेंद्र वाडकर यांच्यासह सातारकरांनीही वारंवार पाठपुरावा केल्याने अध्यक्ष संजीवराजे यांनी स्थायी समितीत हा विषय घेवून यासाठी वेगळी लगेच बैठक घेतली. बैठकीत हायस्कूल पाहून निर्णय घेण्याचे ठरले.

शाळेला उर्जितअवस्था आणणार

त्यानुसार अध्यक्ष, शिक्षण सभापती राजेश पवार, प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी पुनिता गुरव यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. त्यांनी या शाळेबाबत माहिती घेतली. संजीवराजे पुढे म्हणाले, जिह्यात जिल्हा परिषदेचे एकमेव हायस्कूल आहे. या शाळेचा परिसर पाहून मी भारावून गेलो. नक्कीच या शाळेला उर्जितअवस्था आणण्यासाठी प्रयत्न करेन, असा विश्वास त्यांनी मीडियाशी बोलताना दिला.

Related posts: