|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » धारगळ येथे आज स्वामी समर्थ मूर्तिप्रतिष्ठापना

धारगळ येथे आज स्वामी समर्थ मूर्तिप्रतिष्ठापना 

वार्ताहर/ पालये

दाडाचीवाडी-धारगळ येथील श्री साईबाबा मंदिरात गुरुवार 18 रोजी श्री स्वामी समर्थ महाराज मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा तसेच श्री गणेश मूर्ती पुन:प्रतिष्ठापना होणार आहे.

यानिमित्त सकाळी 8 वा. विविध धार्मिक विधी, 10 वा. 46 मिनिटांच्या शुभमुहूर्तावर श्री गणेश मूर्ती पुन:प्रतिष्ठापना आणि श्री स्वामी समर्थ महाराज यांची प्रतिष्ठापना होणार आहे. तद्नंतर तत्वन्यास, प्राणप्रतिष्ठा, महापूजा, दुपारी आरती, नैवेद्य, प्रसाद, अन्नसंतर्पण-महाप्रसाद होईल. दुपारी 2.30 वा. श्री स्वामीसमर्थ मंदिर समिती, शिवोली यांच्यातर्फे स्वामी महाराजांच्या आरत्या होतील. तद्नंतर भजन कार्यक्रम आणि संध्याकाळी 5.30 वा. मान्यवरांचा गौरव सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. संध्याकाळी 7.30 वा. श्री माऊली दशावतारी नाटय़मंडळ प्रस्तुत अक्कलकोट श्री स्वामी समर्थ (स्वामींच्या जीवनावर आधारित विविध ट्रिकसीनसह) नाटक होणार आहे.

स्वामीभक्तांनी या सोहळय़ाला उपस्थित राहून स्वामीकृपेचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान समितीचे अध्यक्ष सुधाकर (मामा) पाडलोसकर आणि व्यवस्थापन समिती व उत्सव समिती पदाधिकाऱयांनी केले आहे.