|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » वरवडे येथे तरुणाची आत्महत्या

वरवडे येथे तरुणाची आत्महत्या 

कणकवली : वरवडे – फणसवाडी येथील सतीश विठोबा बोंद्रे (38) याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी रात्री 9.20 वा. सुमारास उघडकीस आली. आत्महत्येमागचे कारण समजू शकलेले नाही.

सतीश हा रिक्षाचालक तसेच मोलमजुरीची कामे करायचा. वरवडे येथील घरात तो पत्नी व दोन मुलांसमवेत राहत होता. त्याची पत्नी व मुले बाहेरगांवी गेली असल्यामुळे बुधवारी तो एकटाच घरात होता. रात्रीच्या सुमारास परिसरातीलच घरात राहणाऱया त्याच्या आईने त्याला जेवणही आणून दिले होते. दरम्यान, बाहेरगांवी गेलेली सतीशची मुलगी त्याला मोबाईलवर संपर्क करीत होती. मात्र, सतीशकडून उत्तर मिळत नसल्याने तिने आपल्या आजीला म्हणजेच सतीशच्या आईला संपर्क केला. त्यानंतर सतीशच्या आईने तो राहत असलेल्या घराकडे जाऊन पाहिले असता सतीशने घराच्या लाकडी वाशाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतला होता. घाबरलेल्या आईने आरडाओरड केल्यानंतर परिसरातील ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांनी पाहणी केली असता सतीश मयत झाला होता.

घटनेबाबत सतीशचा चुलत भाऊ अमोल गिरीधर बोंद्रे (28, वरवडे -फणसवाडी) याने दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांत नोंद झाली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक धनंजय चव्हाण करीत आहेत. सतीश याच्या पश्चात पत्नी, मुलगी, मुलगा असा परिवार आहे.