|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » चंदुरात आज महालक्ष्मी मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापना

चंदुरात आज महालक्ष्मी मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापना 

वार्ताहर /येडूर :

चंदूर (ता. चिकोडी) येथे खासदार प्रकाश हुक्केरी व आमदार गणेश हुक्केरी यांच्या विशेष प्रयत्नातून व राज्य सरकारच्या अनुदानातून नव्याने बांधण्यात आलेल्या महालक्ष्मी मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम पूर्ण झाले आहे. या मंदिरात 18 व 19 रोजी मूर्तीची प्रतिष्ठापना व कळसारोहण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

18 रोजी सकाळी गावातील सुवासिनी महिलांकडून अंबिल कलशासह लक्ष्मीदेवी मूर्तीची गावातील प्रमुख मार्गावरून विविध वाद्यवृंदात मिरवणूक काढण्यात आली.  19 रोजी गुरुशांतलिंग देशी केंद्र शिवाचार्य स्वामीजी-मांजरी व बसवलिंग स्वामीजी उगार यांच्या सानिध्यात होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार गणेश हुक्केरी असणार आहेत.

सकाळी 7 ते 10 पर्यंत लक्ष्मी मूर्तीची प्रतिष्ठापना व मंदिराच्या जीर्णोद्धारावर कळसारोहण होणार आहे. त्यानंतर दुपारी 12 वाजता उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. कार्यक्रमास खासदार प्रकाश हुक्केरी यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती महालक्ष्मी देवस्थान कमिटीचे अध्यक्ष बाळू आण्णाप्पा कुंभार व सुरेश बाबू कुंभार यांनी दिली.

Related posts: