|Friday, January 18, 2019
You are here: Home » Top News » रायगडमध्ये सव्वादोन कोटींच्या जुन्या नोटा जप्त

रायगडमध्ये सव्वादोन कोटींच्या जुन्या नोटा जप्त 

ऑनलाईन टीम / रायगड :

आठ महिन्यांपूर्वी झालेल्या नोटाबंदीनंतर रात्री रायगड जिह्यातील पाली येथे सुमारे सव्वादोन कोटी रूपयांच्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. यासंबंधी 8 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

काही व्यक्ती जुन्या नोटा घेऊन पाली परिसरात येणार असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार पाली पोलिसांनी खुरावले फाटा येथे नाकाबंदी करून वाहनांची तपासाणी केली. यावेळी एका कारमध्ये तब्बल सव्वादोन कोटीच्या जुन्या नोटा सापडल्या. यावेळी 6 प्रवासी आणि दोन चालकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. दोन कार देखील ताब्यात घेण्यात आल्या आहेत.

 

Related posts: