|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » Top News » विजय मल्ल्याचे फार्महाऊस ईडीकडून जप्त

विजय मल्ल्याचे फार्महाऊस ईडीकडून जप्त 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

भारतातील बँकांचे हजारो कोटी रूपये बुडवून परदेशात पळालेला मद्यसम्राट विजय मल्ल्याला ईडीने दणका दिला आहे. ईडीने मल्ल्याचे अलिबागमधील सुमारे 100 कोटी रूपयांचे फार्म हाऊस ताब्यात घेतले आहे. मांडवा येथे समुद्र किनाऱयालगत मल्ल्याचे 17 एकरच्या आलिशान फार्महाऊस आहे.

गेल्यावर्षी या फार्म हाऊसवर तात्पुतरी जप्तीची कारवाईदेखील करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी फार्म हाऊसमध्ये राहणाऱयांना ईडीने जागा खाली करण्याची नोटीस दिली होती। ईडीच्या मुंबईतील पथकाने मल्ल्याचे अलिशान फार्म हाऊस बुधवारी जप्त केले. या मालमत्तेची किंमत ईडीने 25 कोटी रूपये असल्याचे म्हटले असले तरी बाजारभावानुसार याची किंमत सुमारे 100 कोटी रूपये असल्याचे सांगितले जाते.