|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » मातेच्या दातृत्वामुळे कन्येला मिळाला मातृत्वाचा अधिकार

मातेच्या दातृत्वामुळे कन्येला मिळाला मातृत्वाचा अधिकार 

देशातील पहिली गर्भाशय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी :  : मातेसह कन्याही सुखरूप

प्रतिनिधी/ पुणे

देशातील गर्भाशय प्रत्यारोपणाची पहिली लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया गुरुवारी रात्री यशस्वीपणे पूर्ण झाल्याची माहिती गॅलेक्सी रुग्णालयाचे डॉ. मिलिंद तेलंग, डॉ. संजीव जाधव यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. गर्भाशय दान करणाऱया मातेसह गर्भाशयाचे प्रत्यारोपण करण्यात आलेली त्यांची कन्या सुखरूप असून, त्यांना 24 तास डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले असल्याचे डॉ. तेलंग यांनी सांगितले.

अक्कलकोट येथील 41 वर्षीय मातेने आपल्या 21 वर्षीय मुलीसाठी गर्भाशय दान केले आहे. देशी-विदेशी 12 जणांच्या डॉक्टरांच्या चमूने नऊ तासांच्या अथक प्रयत्नांनी ही प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्याने आता या मुलीला मातृत्वाचा अधिकार मिळणार आहे. विशेष म्हणजे ही शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली. गुरुवारी दुपारी 12.30 च्या सुमारास या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेला सुरुवात झाली. सुमारे साडेआठ ते नऊ तास चालणारी ही शस्त्रक्रिया रात्री सव्वा नऊच्या सुमारास पार पडली. आधी विदेशात अशा शस्त्रक्रिया झाल्या आहेत. पण लॅप्रोस्कोपीद्वारे झालेली ही पहिलीच शस्त्रक्रिया ठरली आहे. डॉ. शैलेश पुणतांबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे झाली. या शस्त्रक्रियेसह आणखीन तीन शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत.

r अन् सर्वांनी टाळ्या वाजविल्या

आईचे गर्भाशय काढले आणि ते मुलीला बसविण्याची शस्त्रक्रिया सुरू झाली. पहिली रक्तवाहिनी यशस्वीपणे जोडली गेल्यानंतर ऑपरेशन थिएटरमध्ये डॉक्टरांनी चक्क टाळ्या वाजविल्या, असे डॉ. संदेश कादे यांनी सांगितले. या यशाबद्दल डॉक्टरांचे अभिनंदन होत आहे.

Related posts: