|Monday, April 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » राज्यराणी एक्सप्रेस होणार आता ‘तुतारी एक्सप्रेस’!

राज्यराणी एक्सप्रेस होणार आता ‘तुतारी एक्सप्रेस’! 

अभिजित नांदगावकर/ रत्नागिरी

आधुनिक मराठी कवितेचे जनक, क्रांतीकारक कवी म्हणून ओळखले जाणारे रत्नागिरीचे सुपूत्र कवी केशवसूत यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांच्या सुप्रसिद्ध ‘तुतारी’ या कवितेच्या नाव एक्स्प्रेसला देण्याचा महत्वपूर्ण निर्णय कोकण रेल्वेने घेतला आहे. कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱया ‘राज्यराणी एक्सप्रेस’ने नामकरण आता ‘तुतारी एक्सप्रेस’ असे करण्यात आले आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांच्या हस्ते 22 मे रोजी सायंकाळी 4.30 वाजता दादर येथे हा नामकरण सोहळा होणार असून यावेळी नामवंत कवी व कलाकारांकडून केशवसुतांच्या कवितांच अभिवाचन होणार आहे. तुतारी एक्सप्रेस नामकरणामुळे कोकण मराठी साहित्य परिषदने आठ वर्षांपूर्वी केलेल्या मागणीला अखेर मूर्त स्वरूप आले आहे.

‘एक तुतारी द्या मज आणुनी, फुंकीन मी ती स्वप्राणाने’ या कवी केशवसूतांच्या ‘तुतारी’ कवितेतील ओळींना साहित्यक्षेत्रातच नव्हे, तर सामाजिक क्षेत्रातही महत्वाचे स्थान आहे. ‘तुतारी’ कवितेला यावर्षी 100 वर्षे पूर्ण होत आहेत याचेच औचित्य साधत कवी केशवसूतांचा सन्मान करण्याचा निर्णय कोकण रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. एका मराठी कवीला आणि त्याच्या साहित्याला मिळालेला हा एक मोठा सन्मान आहे. ‘तुतारी एक्सप्रेस’मुळे कवी केशवसूतांचे स्मरण सतत घडणार आहे.

कोकण रेल्वे म्हणजे एक क्रांतीकारक पाऊल आहे. एक दिवास्वप्न समजले जाणारे हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी कोकणच्या सुपूत्रांनी विशेष प्रयत्न केले. याबाबत सांगताना ‘कोमसाप’चे केंदीय अध्यक्ष डॉ. महेश केळुसकर म्हणाले की, कोकण रेल्वेची मूळ संकल्पना कोकणचे सुपूत्र, जुन्या रेल्वेत ड्राफ्टस्मन म्हणून कार्यरत असलेले अ. बा. वालावलकर यांची, त्यांनी ब्रिटीश सरकारला कोकण रेल्वेचा प्रस्ताव सादर केला होता.

त्यानंतर बॅ. नाथ पै यांनी संसदेत वारंवार कोकण रेल्वेचा प्रश्न उठवला. त्यांच्यानंतर त्यांचे शिष्यगण तत्कालीन रेल्वेमंत्री जॉर्ज फर्नांडिस, अर्थमंत्ज्ञी मधु दंडवते आणि रामकृष्ण हेगडे यांनी हे दिवास्वप्न पूर्णत्त्वास नेले. कोकण रेल्वेच्या क्रांतीकारक पावलाप्रमाणे साहित्यात क्रांतीकारक पाऊल उचलणाऱया कवी केशवसूतांच्या ‘तुतारी’ च्या नावे एक एक्सप्रेस असावी, अशी मागणी 8 वर्षांपूर्वी कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे कोकण रेल्वे प्रशासनाला करण्यात आली होती. संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यमान केंद्रीय अध्यक्ष कवी डॉ. महेश केळुसकर, अण्णा राजवाडकर, कार्याध्यक्षा सौ. नमिता कीर यांनी ही मागणी गेली 8 वर्षे लावून धरली होती.

22 मे रोजी ‘दादर-सावंतवाडाöदादर’ अशी धावणाऱया राज्यराणी एक्सप्रेसचे ‘तुतारी एक्सप्रेस’ म्हणून नामकरण होणार आहे. दादर (पूर्व) येथील कोकण रेल्वेच्या कोहिनूर हॉलमध्ये हा दिमाखदार सोहळा पार पडणार आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांच्या हस्ते हा नामकरण सोहळा होणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अवजड उद्योगमंत्री अनंत गीते, शिक्षणमंत्री विनोद तावडे, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, रत्नागिरीचे पालकमंत्री रविंद्र वायकर, ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, खासदार राहुल शेवाळे, कालिदास कोळंबकर को.म.सा.प.चे संस्थापक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, अध्यक्ष डॉ. महेश केळुसकर, मुंबई विद्यापीठ कुलगुरू संजय देशमुख आदी मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.

केशवसुतांच्या कवितांचे अभिवाचन

या नामकरण सोहळय़ावेळी कवी केशवसुतांच्या स्मृतींना अभिवादन करत त्यांच्या कवितांचे नामवंत कवी व कलाकारांकडून अभिवाचन होणार आहे. यामध्ये अशोक नायगावकर, अरूण म्हात्रे, महेश केळुसकर, जयंत सावरकर, रमेश भाटकर, मोहन जोशी, दिपक करंजीकर, शशिकांत तिरोडकर, नमिता किर, गौरी कुलकर्णी आदींचा सहभाग असेल.

 

प्रभूंनी शब्द पाळला-डॉ. केळुसकर

कोकणचे सुपूत्र असलेल्या रेल्वेमंत्री सुरेश प्रभुंनी ‘कोकण मराठी साहित्य परिषद’ची ही मागणी पूर्णत्त्वास नेली आहे. प्रभूंनी दिलेला शब्द पाळल्याचे केंद्रीय अध्यक्ष डॉ. कवी केळुसकर यांनी सांगून प्रभूचे को.म.सा.प.तर्फे आभार व्यक्त केले आहेत. एका ऐतिहासिक कार्याला त्यांनी मूर्त स्वरूप दिल्याची प्रतिक्रिया डॉ. महेश केळुसकर यांनी व्यक्त केली.

काव्यशीर्षकाची भारतातील दुसरी एक्सप्रेस

‘तुतारी एक्सप्रेस’ ही कवितेच्या शीर्षकाच्या नावाने धावणारी भारतातील दुसरी एक्सप्रेस ठरणार आहे. याआधी रविंद्रनाथ टागोर यांच्या ‘गीतांजली’ कवितेच्या शीर्षकाने ‘गीतांजली एक्सप्रेस’ ही देशातील पहिली एक्सप्रेस धावत आहे. त्यापाठोपाठ देशातील दुसरी व कोकणच्या इतिहासातील काव्यशीर्षकाची ही प†िहली एक्सप्रेस ठरणार आहे. कोकणचे सुपूत्र कवी केशवसूतांचा कोकण रेल्वेकडून होत असलेल्या यथोचित सन्मानाबद्दल साहित्यक्षेत्रातून आनंद व्यक्त होत आहे.

Related posts: