|Tuesday, October 16, 2018
You are here: Home » मनोरंजन » ‘हाफ गर्लप्रेंड’ची बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई

‘हाफ गर्लप्रेंड’ची बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई 

ऑनलाईन टीम / मुंबई :

‘हाफ गर्लप्रेंड’ या सिनेमाने रिलीज झाल्याच्या पहिल्या दिवशीच बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई केली आहे. सिनेमाने पहिल्या दिवशीच 10 कोटी 27 लाखांची कमाई केली आहे.

बालाजी मोशन पिक्चर्स निर्मित ‘हाफ गर्लप्रेंड’ या सिनेमाने 10 कोटी 27 लाखांचा रेकॉर्ड बनवला आहे. आयपीएल सेमीफायनलचा फिव्हर असूनही ‘हाफ गर्लप्रेंड’ या सिनेमाची प्रेक्षकांची चर्चा सुरु आहे. सिनेमागृहात प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली. बाहुबली-2 आणि आयपीएलचा फिव्हर असूनही प्रेक्षकांची संख्या वाढल्याने आत्तापर्यंत 10 कोटी 27 लाखांची कमाई केली. यापुढेही या सिनेमाला भरघोस प्रतिसाद मिळेल, असे सांगितले जात आहे.

Related posts: