|Tuesday, November 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » विजापुरात 200 दुकानांना ठोकले टाळे

विजापुरात 200 दुकानांना ठोकले टाळे 

जिल्हा प्रशासनाची कारवाई : वाहतुकीला अडचण होत असल्याने कारवाई

विजापूर/वार्ताहर

इंडी-सिद्धेश्वर-गांधी चौक रस्त्यावरील सुमारे 200 दुकानांना जिल्हा प्रशासनाच्यावतीने टाळे ठोकण्यात आले. वाहतुकीला अडचण होत असल्याने ही कारवाई शनिवारी सकाळी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी के. बी. शिवकुमार, महापालिका आयुक्त हर्षा शेट्टी, डीएसपी राम अरसिद्धी, सीपीआय बसवराज यरनाळ, पीएसआय एस. बी. पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली ही करवाई करण्यात आली.

 इंडी-सिद्धेश्वर-गांधी चौक रस्त्यावर दोन वर्षापासून वाहतुकीला अडचण व मोठय़ा प्रमाणात ट्रॉफीक होत होते. येथील दुकानदार आपला माल आणण्यासाठी याच रस्त्याचा उपयोग करत होते. तसेच माल आणण्यासाठी भल्या मोठय़ा वाहनांची मदत घेण्यात येत होती. त्यामुळे तासन्तास नागरिकांना ताटकळत राहावे लागत होते. तसेच रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात टॉफीक असल्याने वाहतुकीला अडचण होत होती.

 याची दखल घेऊन जिल्हा प्रशासनाकडून दुकानांना इंडस्ट्रीयल एरीयामध्ये स्थलांतर करण्यासाठी दोन वर्षापूर्वी नोटीस देण्यात आली होती. पण याची दुकानदारांनी दखल घेतली नसल्याने प्रशासनाकडून ही कारवाई हाती घेऊन 200 दुकानांना टाळे ठोकण्यात आले. त्यामुळे दुकानदारांना जिल्हा प्रशासनाकडून मोठी चपराक बसली असल्याने दुकान स्थलांतराशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नसल्याचे सांगण्यात येत आहे. ही कारवाई जिल्हाधिकारी के. बी. शिवकुमार, महापालिका आयुक्त हर्षा शेट्टी, डीएसपी राम अरसिद्धी, सीपीआय बसवराज यरनाळ, पीएसआय एस. बी. पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली करण्यात आली.

Related posts: