|Saturday, October 20, 2018
You are here: Home » Top News » काश्मीरात हिंसा भडकावण्यासाठी पाकिस्तानकडून एक हजार कोटी

काश्मीरात हिंसा भडकावण्यासाठी पाकिस्तानकडून एक हजार कोटी 

ऑनलाईन टीम / काश्मीर :

काश्मीरात हिंसक वातावरण निर्माण करण्यासाठी दहशतवादी संघटनेकडून पाकिस्तानची एजन्सी आयएसआय फंडिंग करत असल्याची माहिती मिळत आहे. तसेच हवालाच्या माध्यमातून दरवर्षी एक हजार कोटी रुपयांची फंडिंग पाकिस्तान या दहशतवादी संघटनेसाठी देत आहे.

पाकिस्तानची एजन्सी आयएसआय दहशतवादी संघटनेसाठी फंडिंग करत असल्याचे सांगण्यात येत आहे. या फंडिंगच्या माध्यमातून दहशतवादी कारवाया आणि काश्मीरातील तरुणांना संघटनेत भरती करण्यासाठी त्याचा उपयोग केला जात आहे. तसेच हवाला माध्यमातून काश्मीरात पैसे येण्याचा प्रकार मागील तीन वर्षांत वाढला असून, याबाबतची 16 प्रकरणे समोर आली आहेत. यासंबंधी सुरक्षा एजन्सीने केंद्रीय गृहमंत्रालयाला याबाबतचा अहवाल पाठवला आहे.

Related posts: