|Monday, April 22, 2019
You are here: Home » Top News » मिश्रा दिशाभूल करत आहेत ; दिल्ली सरकारचा आरोप

मिश्रा दिशाभूल करत आहेत ; दिल्ली सरकारचा आरोप 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

दिल्लीचे माजी मंत्री कपिल मिश्रा हे 400 कोटींच्या उच्च सुरक्षा नंबर प्लेट घोटाळ्याप्रकरणी दिशाभूल करत असल्याचा आरोप दिल्ली सरकारकडून करण्यात येत आहे. मात्र, आप नेत्यांच्या रशिया दौऱयाबाबत कोणतेही भाष्य केले नाही.

आम आदमी सरकारचे प्रवक्ते नागेंद्र शर्मा यांनी आम आदमी पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या समर्थनार्थ आले. या नंबर प्लेट घोटाळ्याची चौकशी 49 दिवसांच्या आम आदमी सरकारच्या कार्यकाळात तत्कालीन मंत्री सौरभ भारद्वाज यांनी केली होती. मात्र, तत्कालीन नायब राज्यपाल नजीब जंग यांनी हा निर्णय मागे घेतला. तसेच शर्मा यांनी कंपनीच्या विनंतीवर लवादासाठी पाठविल्यानंतर जानेवारी 2016 मध्ये दिल्ली सरकारने या घोटाळ्यात भ्रष्टाचारविरोधी पथकाला याबाबतची फाइल पाठवली.

Related posts: