|Friday, May 24, 2019
You are here: Home » Top News » पाकिस्तानात भारतीय नागरिकाला अटक ; कागदपत्रांची पूर्तता न केल्याने कारवाई

पाकिस्तानात भारतीय नागरिकाला अटक ; कागदपत्रांची पूर्तता न केल्याने कारवाई 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

पाकिस्तानमधील इस्लामाबादमध्ये एका भारतीय नागरिकाला पोलिसांनी अटक केली. प्रवासासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली नसल्याने त्याला अटक करण्यात आली आहे.

भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधवप्रकरण ताजे असतानाच आता भारतीय नागरिकाला पाकिस्तानात अटक झाली आहे. नबी शेख असे अटक केलेल्या तरुणाचे नाव असून तो मुंबईचा रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. नबीविरोधात परदेशी नागरिक कायदा 1946 अंतर्गत कारवाई करण्यात आली असून, त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Related posts: