|Thursday, May 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » विविध संघटनांची मुख्यमंत्र्यांना निवेदने

विविध संघटनांची मुख्यमंत्र्यांना निवेदने 

प्रतिनिधी/ सातारा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सातारा जिह्याच्या दौऱयावर आले होते. त्यांच्या दौऱयावेळी अनेक संघटना, विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली. आता दौऱयानंतर विविध संघटना, पक्षांच्या कार्यकर्त्यांनी दिलेली पत्रकातून समस्या मांडत असल्याचे दिसू लागले आहे. त्यामध्ये भाजपाच्या सातारा शहर शाखेने माजी सैनिकांच्या मृत्यू पश्चात त्यांच्यावर शासकीय इतमामांत अंत्यसंस्कार व्हावेत, कण्हेर कॅनॉल दुरुस्त करण्यात यावी या आदी मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले.

भाजपाचे सातारा शहर सरचिटणीस विकास गोसावी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, माजी सैनिकांच्या मृत्यू पश्चात त्यांच्यावर शासकीय इंतमामात अंत्यसंस्कार करण्यात यावेत, या मागणीबरोबरच, सातारा शहराच्या पूर्व बाजूने कण्हेरचा डावा कालवा गेला आहे. या कॅनॉलची दुरुस्ती आजपर्यंत झालेली नाही. दोन्ही बाजूंच्या पडद्यांचे सिमेंट निघून गेले आहे. त्यामुळे जवान को ऑप हौसिंग सोसायटी, जेसी ओज, ऑफिसर्स को ऑप हौसिंग सोसायटी, कांगा कॉलनी, कुपर कॉलनी, मिलिंद सोसायटी येथील जवळ-जवळ एक हजार पेक्षा जास्त घरांच्या खालून पाणी जात आहे. त्यामुळे या घरांचे नुकसान होत आहे. मध्यंतरीच्या काळात ज्या ठिकाणी बी. व्ही. जी या कंपनीचे बांधकाम साहित्य ठेवण्यात आले होते.

त्या 300 फुट लांबीच्या जागेचे पंचिंग कुन त्या ठिकाणच्या दोन्ही साईड पट्टय़ा दुरुस्त करण्यात आल्या. परंतु ज्या सामान्य लोकांना अनेक वर्ष हा त्रास होत आहे. तसेच भाजपाचे युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल कांबळे यांनीही निवेदन देवून खाजगी शाळेतील अन्यायकारक डोनेशन रद्द करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. त्याचबरोबर महिलांची सुरक्षितेसाठी गांभिर्याने कठोर कायद्याची अंमलबजावणी होत नाही. निभर्या पथकांची स्थापना केली. परंतु त्यामधून महिला सबलीकरणासाठी यश येत नाही. साताऱयात महिला अधिकारी व पदाधिकारी असूनही महिलांच्या प्रश्नांवर विशेष जलदगतीने होताना दिसत नाही, अशी मागणी रिपब्लिकन पार्टीच्या मुस्लिम आघाडीच्या आयेशा पटनी यांनी केली आहे.

पीपल्स पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष पार्थ पोळके यांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे, भाजपाच्या सरकारला तीन वर्ष झाली. हे सरकार भाजपाचे म्हणून ओळखले जात नाही तर मोंदीजींचे सरकार म्हणून ओळखले जाते. हे सरकार पूर्णतः हुकूमशाहीवादी आहे,   असा आरोप त्यांनी पत्रकातून केला आहे.a

Related posts: