|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » पर्यटकांनी महाबळेश्वर फुलले

पर्यटकांनी महाबळेश्वर फुलले 

प्रतिनिधी / महाबळेश्वर

उन्हाळी हंगामातील सुट्टय़ा, तसेच विकेंड सुट्टय़ा व त्यातून मुस्लीम समाजाचा पवित्र रमजान उपवास सुरु होण्यापूर्वीचा आठवडा.. त्यामुळे महाराष्ट्राचे नंदनवन समजले जाणारे महाबळेश्वर या ठिकाणी पर्यटकांची प्रचंड गर्दी होत असून सर्वत्र गर्दीच गर्दी पहायला मिळत आहे. वेण्णा लेक असो अथवा येथील विविध प्रक्षणीय स्थळे सर्वत्रच दिवसभर गर्दी दिसत आहे.

येथील प्रसिद्ध बाजार पेठेत तर दिवस-रात्री पर्यटनांनी येथील बाजार पेठ फुलून गेली आहे. वेण्णा लेक येथे सायंकाळी सूर्यास्ताच्या साक्षीने नौकाविहार, घोडे सावरीचा आनंद घेणे तसेच गरम गरम स्वादीष्ठ कणीस खाणे हा तर पर्यटकांचा नित्य आनंद बनला आहे. सध्या या गिरीशिखरावर तर बारमाही पर्यटकांची गर्दी असते.

पर्यटन स्थळ हाउस फुल्ल

विकेंड व त्यासह सलग सुट्टी असली की, हे पर्यटन स्थळ हाउस फुल्ल होऊन जाते. मात्र, पूर्वीसारखी येथे महिना-महिना उन्हाळी गर्दी पहायला मिळत नाही. साधारण मे महिन्याच्या शेवटच्या दोन आठवडय़ात व जून महिन्याचा पहिला आठवडा येथे उन्हाळी गर्दी असते, त्यातून विकेंड व सलग जादाच्या सुट्टय़ा असल्या की, हे गीतीशिखर पर्यटकांनी तुडूंब भरलेले असते. पुढील आठवडय़ात मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान हा सण व त्याचे उपवास सुरु होणार असल्याने या गीरीशिखारावर या समाजाचे हौशी मोठय़ा संख्येने सध्या दिसत आहेत.