|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » Top News » राजकारणापासून दूर राहा ; रजनीकांत यांना धमकी

राजकारणापासून दूर राहा ; रजनीकांत यांना धमकी 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांना राजकारणापासून दूर राहण्यासाठी विरोध केला जात असून, त्यांना धमक्याही दिल्या जात आहेत. त्यामुळे रजनीकांत यांच्या घराबाहेर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

काही दिवसांपासून रजनीकांत राजकारणात प्रवेश करणार अशी चर्चा सुरु आहे. रजनीकांत हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय असल्याने ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. याबाबतची चर्चा सुरु असताना तामिळनाडूतील तामिलार मुन्नेत्र पडाई गटाने रजनीकांत यांना तामिळनाडूच्या राजकारणापासून दूर राहावे, असा इशारा दिला. या गटाने सांगितले, कन्नडांनी तामिळनाडूवर राज्य करु नये. त्यामुळे आम्हाला त्यांचा विरोध राहील.