|Wednesday, October 16, 2019
You are here: Home » उद्योग » पंतप्रधान आवास योजनेंतर्गत यंदा 12 लाख घरे बांधणार

पंतप्रधान आवास योजनेंतर्गत यंदा 12 लाख घरे बांधणार 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

पंतप्रधान आवास योजनेंतर्गत 2017-18 या आर्थिक वर्षात 12 लाख घरे बांधण्यात येणार आहेत. या योजनेखाली गेल्या आर्थिक वर्षात केवळ 1.48 लाख घरे बांधण्यात आली होती. पंतप्रधान आवास योजनेत (नागरी) 2018-19 मध्ये 20 लाख, 2019-20 मध्ये 20 लाख, 2020-21 मध्ये 30 लाख आणि 2012-22 मध्ये 29.80 लाख घरे बांधण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे वरिष्ठ अधिकाऱयाने म्हटले.

2022 पर्यंत देशातील सर्व नागरिकांना घरे देण्यासाठी मोदी सरकार प्रयत्नशील आहे. यासाठी सरकारकडून योग्य ती पावले उचलण्यात येत आहेत. मात्र घरे बांधण्यासाठी सरकारला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. भूमि अधिग्रहणास विलंब होत असल्याने ही योजना पूर्णत्त्वास नेण्यासाठी सरकारला अधिक मेहनत करावी लागते. 18.76 लाख घरे बांधण्यासाठीच्या प्रस्तावाला संमती मिळाली आहे आणि 13.06 लाख घरे उभारण्यासाठी निधी पुरविण्यात आला. मात्र जमीन ताब्यात घेण्यासाठी विलंब होत असल्याने 2016-17 मध्ये केवळ 1.49 लाख घरे बांधण्यात आल्याचे अधिकाऱयाने सांगितले.

2022 पर्यंत सर्वांना घरे देण्यासाठी मोदी सरकारने पंतप्रधान आवास योजना जून 2015 मध्ये सुरू केली आहे. दरवर्षी 3 लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱया लोकांना या योजनेतून घर देण्यात येईल. या योजनेतून घर घेण्यासाठी 8.97 लाख अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

विकास मंत्री एम. वंकय्या नायडू यांनी गेल्या महिन्यात म्हटले होते.