|Tuesday, July 17, 2018
You are here: Home » विविधा » इथे आहे उंदरांसाठी खास कॅफे

इथे आहे उंदरांसाठी खास कॅफे 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली  :

उंदीर पहिला तरी अनेकांना उंदराची भीती वाटते किंवा त्यांची किळस येते. मात्र अमेरिकेत चक्क उंदरांचा कॅफे लवकरच उघडणार आहे. उंदरांच्या कॅफे नक्की कसा असणार आहे याबाबत अजूनही प्रश्नचिन्ह आहे.

या कॅफेत उंदरांसोबत कॉफीचा अस्वाद घेता येणार आहे. अमेरिकेतील सॅन फ्रान्सिसको शहरात हा कॅफे उघडण्यात येणार असून या कॅफेतील एखादा उंदीर अवडल्यास त्याला दत्तकही घेता येणार असल्याचे सांगण्यात यत आहे. या कॅफेचे नाव ‘द ब्लॅक कॅट कॅफे’असे असणार आहे. आता या कॅफेला किती पसंती मिळते याकडे लक्ष असेल.

 

Related posts: