|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

मेष

कोणत्याही प्रकारची काळजी करण्याची गरज नाही. पण अमावस्या तोंडावर असल्याने खर्चावर नियंत्रण ठेवा. मित्र मैत्रिणीची साथ मिळेल. नोकरीत आनंदाची बातमी कळेल. जे काम हाती घ्याल ते जिद्दीने पुरे करा. अंगातील उष्णता, पित्त कमी करा. त्यामुळे आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतो. सामाजिक कार्यात असाल तर मानसन्मान वाढेल. या सप्ताहात कोठुन ना कोठून पैशाची आवक वाढेल.


वृषभ

आमदानी आठन्नी खर्चा रुपया असा अनुभव येईल. येणे वसुली असेल तर पराकाष्टाने येईल. सरकारी कामकाजात अडथळे निर्माण होतील. उद्योग व्यवसाय भरभराटीस येईल. कुटुंबात वादविवाद निर्माण होण्याची शक्मयता. त्यासाठी डोके शांत ठेऊन मगच कोणताही निर्णय घ्या. कोर्ट कचेऱयांची कामे असतील तर शक्मयतो लवकरात लवकर प्रयत्न करून निकाल लावून घ्या. अन्यथा सरकारी कामे लांबणीवर पडत जातील.


मिथुन

जीवनात अनेक अडचणी आल्या तरी त्यावर मात करून पुढे जाण्याचे ध्येय तुमचे आहे. खर्चाचे प्रमाण वाढले तरी तितकाच पैशाचा आवकही वाढेल. नोकरीत  समाधान लाभेल. उद्योग, व्यवसाय, व्यापार असेल तर चंचलपणा कमी करून त्यावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रीत करा. मित्र मैत्रीणीचे सहकार्य उत्तम लाभेल. सरकारी कामात मनासारखे यश मिळेल. पण त्यासाठी जास्त धडपड करावी लागेल. कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या.


कर्क

जे काम अंगावर घ्याल ते यशस्वी रीतीने पार पाडवून दाखवा. नोकरीत प्रयत्न करत असाल तर त्यात उत्तम यश मिळेल. व्यापार, उद्योग, धंदा तसेच जमिनीची देवाण घेवाण करत असाल तर त्यात जातीने काळजीपूर्वक लक्ष घाला. चूक होऊ देऊ नका. साध्या सुध्या कारणावरून कुटुंबात मतभेद वाढतील पण ते विकोपाला नेऊ नका. थोरा मोठय़ांचा सल्ला घ्या व त्यांच्या मदतीने आर्थिक चणचण भासणार नाही. खर्चावर नियंत्रण ठेवा.


सिंह

येणी वसुल करण्यासाठी फार तगादा लावावा लागेल. मुला-बाळांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागणार आहे. भागिदार व्यवसाय असेल तर त्यांच्याशी वादविवाद होण्याचे योग दिसतात. मित्रांशी अथवा दुसऱयांशी कोणताही व्यवहार करताना जपून करावा. फसगत होण्याचे योग दिसतात. भांडण, तंटे, वादविवाद यापासून दूर रहा. क्य़ापार, उद्योग व व्यवसाय, नोकरीत दगदग जाणवल्याने प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका.


कन्या

कौटुंबिक कटकटी वाढतील. कामाच्या अति ताण तणावामुळे जीवाला शांती मिळणार नाही. कोणतीही गोष्ट अविचाराने करू नका. मनात नवनवीन कल्पना येतील. त्याचप्रमाणे योजनादेखील आखाल. पण त्यात कितपत यश येईल. हे थोरा मोठय़ांच्या सल्ल्यानेच पुढे जावा. आर्थिक चणचण भासणार नाही. पण व्यवहार मात्र जपून करा. आपले कोन व परके कोन याचा तळमेळ बघून वागा. हातापायाची जुनी दुखणी डोके वर काढतील.


तुळ

 आर्थिक भरभराटीच्या दृष्टीने सुवर्णसंधी मिळेल. सतत काही ना काही  लाभ होतील. किंवा नोकरीत पगारवाढ, व्यवसायात उर्जितावस्था येईल. कुटुंबातील वातावरण चांगले राहील. आतापर्यंत न झालेली एखादी महत्त्वाकांक्षा पूर्ण होईल. अनिष्टग्रहांचा प्रभाव सौम्य होऊ लागेल. पण तरीही बेसावध राहू नका.


वृश्चिक

 आठवडय़ाची सुरुवात शुभमंगलमय वातावरणाने होत आहे. त्यामुळे आर्थिक लाभाच्या बाबतीत चांगला काळ पूर्वी केलेल्या कष्टाचे फायदे मिळतील. पैसा अडका मानसन्मान सुधारणा, विवाह, नोकरी, व्यवसाय या सर्व बाबतीत अनुकूल योग. काही जुनी येणे वसूल होतील. काळाच्या विस्मरणात गेलेल्या जुन्या आठवणींना उजाळा मिळेल.


धनु

आर्थिक बाबतीत चांगला सप्ताह काही महत्त्वाच्या कामांची सुरुवात धार्मिक कार्याने होईल. दैवी सहाय्य मिळण्याची शक्मयता आहे. तुमच्या घरात व्रतवैकल्ये सुरू असतील. कुलदेवाचा कुलाचार व्यवस्थित चालू असेल तर हा आठवडा तुम्हाला सर्व बाबतीत यश देणारा आहे. नवीन  व्यवसायाच्या दृष्टीने अनुकूल वातावरण.


मकर

धनलाभ व व्यवसाय व आरोग्याच्या बाबतीत चांगली प्रगती होईल. आर्थिक प्रश्न या सुटतील. विवाहाच्या वाटाघाटीना यश मिळेल. प्रवासाच्या संधी येतील. काही जुने व्यवहार पूर्ण करू शकाल. कौटुंबिक वातावरणात  जरासा  फरक जाणवेल. कामाचे स्वरुप बदलल्यास अनेक महत्त्वाच्या समस्या मिटतील.  नवीन व्यवसाय सुरू करण्यास अनुकूल काळ.


कुंभ

नोकरी व्यवसाय, लिखाण देणीघेणी महत्त्वाच्या वाटाघाटी व नातेसंबंधात काही चांगल्या घटना घडतील. सासू सासरे, माता पित्यांच्या बाबतीत महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. 25 चा घबाड योग. अतिशय लाभदायक ठरेल. धनलाभ व थोरामोठय़ांच्या ओळखी होतील. नवीन मैत्री जोडण्यास  चांगले नवे स्नेहसंबंध जुळतील.


मीन

अंगारक योगावर भाग्योदयकारक घटना घडतील. मूळ पुंडलीत ग्रहमान चांगले असले तर हा आठवडा तुम्हाला लाभदायक ठरेल. नोकरीत अविस्मरणीय घटना घडवील त्याचे  अनुभव  दोन तीन महिन्यात येतील. तरुण तरुणींना प्रेमप्रकरणात सावधानता बाळगावी फसवणूक योग तसेच नवीन नोकरी मिळेल.

Related posts: