|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » धामणे ग्रा.पं.क्षेत्रात दारू दुकानास विरोध

धामणे ग्रा.पं.क्षेत्रात दारू दुकानास विरोध 

अध्यक्षा-उपाध्यक्षांसह सदस्यांनी बैठक घेऊन केला ठरावः पीडीओ-क्लार्कची हकालपट्टी करण्याची मागणी

वार्ताहर/ धामणे

धामणे ग्राम पंचायत कार्यक्षेत्रात दारू दुकान होणार अशी चर्चा गावात गेल्या आठवडय़ापासून सुरू असून याबाबत ग्राम पंचायतीची नुकतीच तातडीची बैठक घेण्यात येऊन दारू दुकानाच्या विरोधात जिल्हा प्रशासनाला 15 मे रोजी निवेदन देण्यात आले.

धामणे-वडगाव रस्त्याशेजारी गावापासून अवघ्या काही अंतरावर हा व्यवसाय चालू करण्यात येणार असल्याने याचा नागरिकांना मोठय़ा प्रमाणात त्रास होणार आहे. यासाठी ग्राम पंचायतमध्ये ठराव करून त्याला विरोध करण्यात आला. दारू दुकानाला परवानगी देऊ नये, याबाबत ग्राम पंचायत अध्यक्षा करेव्वा नाईक, उपाध्यक्षा गीता येळ्ळूरकर, सदस्या चांगुणा पाटील, दीपा तुळजाई, वनिता पाटील, लक्ष्मी सैबन्नावर, मुमताज किल्लेदार, सदस्य पंडित पाटील, मारुती सैबन्नावर, उदय हजेरी, प्रवीण बुडवी, महादेव यळवी, विजय बाळेकुंद्री, एम. आर. पाटील यांच्या उपस्थितीत 15 मे रोजी जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी व ता. पं. कार्यकारी अधिकाऱयांना निवेदन देण्यात आले.

पीडीओंचा मनमानी कारभार

पीडीओ आणि ग्राम पंचायतीच्या कर्मचाऱयांनी अध्यक्षा, उपाध्यक्षा व सर्व सदस्यांना विश्वासात न घेता सर्व्हे नंबर 614 मध्ये शेड बांधून त्याला रोडवर बसवून पावती दिली आहे. असे असताना ग्राम पंचायतीने पीडीओंना अद्याप जाब का विचारला नाही, असा प्रश्न नागरिकांतून विचारला जात आहे.

यापुढे तरी ग्रा. पं. अध्यक्षा, उपाध्यक्षा व सर्व सदस्यांनी मिळून पीडीओ व क्लार्कची हकालपट्टी करावी, अशी मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे.

Related posts: