|Wednesday, December 19, 2018
You are here: Home » मनोरंजन » सिद्धार्थ-सोनालीच्या ‘गुलाबजाम’चे पोस्टर प्रदर्शित

सिद्धार्थ-सोनालीच्या ‘गुलाबजाम’चे पोस्टर प्रदर्शित 

ऑनलाईन टीम / मुंबई   :

नेहमीच चाकोरी बाहेरचा विचार करणारा दिग्दर्शक अशी सचिन कुंडलकरची ओळख . याच ओळखीला साजेसा असा त्याचा ‘गुलाबजाम’हा नवा सिनेमा लवकरच येतो आहे. ‘वजनदार’च्या यशानंतर कुंडलकर यांच्या नव्या सिनेमाचे नाव ही उत्सुकता वाढवणारे आहे.

सिद्धार्थ चांदेकर आणि सोनाली कुलकर्णी यांच्या मुख्य भूमिका असणाऱया या सिनेमाचा पोस्टर सध्या सोशल मीडियावर मोठय़ा प्रमाणात व्हायरल होत आहे. सिद्धार्थने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून या सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित केले आहे. कुंडलकर यांनीही त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे पोस्टय प्रदर्शित करत सिनमाची कथा नेमकी काय असणार हेही सांगितले. सिनेमाचे लंडनमधील चित्रीकरण पूर्ण झाल्याची माहितीही कुंडलकर यांनी त्यांच्या पेस्टमध्ये दिली आहे.

 

Related posts: