|Friday, October 19, 2018
You are here: Home » Top News » नेपाळचे पंतप्रधान प्रचंड यांचा राजीनामा

नेपाळचे पंतप्रधान प्रचंड यांचा राजीनामा 

ऑनलाईन टीम / काठमांडू :

नेपाळचे पंतप्रधान पुष्पा कमल दहाल अर्थात ‘प्रचंड’ यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता नेपाळच्या पंतप्रधानपदी कोण विराजमान होणार हे पाहावे लागेल.

पंतप्रधान प्रचंड यांनी एका वाहिनीवर संबोधताना ही घोषणा केली. त्यानंतर त्यांनी नेपाळचे राष्ट्रपती बिध्या देवी भंडारी यांच्याकडे अधिकृतपणे पदाचा राजीनामा सोपवला. मागील वर्षी केलेल्या करारानुसार पंतप्रधान प्रचंड यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर नेपाळी काँग्रेसचे अध्यक्ष शेर बहादुर देओबा हे नेपाळमध्ये सरकार स्थापनेचा दावा करतील अशी चर्चा सुरु आहे. प्रचंड यांनी राजीनामा दिल्यामुळे देओबा हे सत्ता स्थापन करेपर्यंत नेपाळमध्ये काळजीवाहू सरकार असणार आहे.

Related posts: