|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » अनधिकृत फलक हटविण्याची कारवाई

अनधिकृत फलक हटविण्याची कारवाई 

प्रतिनिधी / बेळगाव

शहर आणि उपनगरांमधील प्रमुख रस्त्यांवर, चौकांमध्ये अनधिकृत जाहिरात फलक लावण्यात आले असल्याने वाहतूक-रहदारीस अडचण होत आहे. तसेच महापालिकेचे उत्पन्नही बुडत आहे. यामुळे मंगळवारपासून अनधिकृत फलक हटविण्याची कारवाई करण्यात येत आहे.

जाहिरात फलक, बॅनर्स लावण्यासाठी महापालिकेकडून रितसर परवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र शहरात बहुतांश ठिकाणी विनापरवाना फलक आणि बॅनर्स लावण्यात येत आहेत. परिणामी महापालिकेसचा महसूल बुडत आहे. यामुळे अनधिकृत फलक व बॅनर्सचा शोध घेवून हटविण्याचा आदेश महापालिका आयुक्तांनी दिला आहे. यामुळे अनधिकृत फलक हटविण्याची कारवाई राबविण्यात येत आहे. बुधवारी ही मोहीम शाहूनगर, गांधीनगर परिसरासह विविध भागात राबविण्यात आली. काही ठिकाणी अनधिकृत शेड घालून आयुर्वेदिक औषधे विक्रीचा व्यवसाय सुरू करण्यात आल्याचे निदर्शनास आले. यामुळे शेडदेखील हटविण्याची कारवाई करण्यात आली. कारवाईवेळी अतिक्रमण निर्मूलन पथकाचे निरीक्षक अर्जुन देमट्टी उपस्थित होते.