|Thursday, June 20, 2019
You are here: Home » Top News » ठाण्यात रिक्षावाल्यांचा संप, प्रवाशांची तारांबळ

ठाण्यात रिक्षावाल्यांचा संप, प्रवाशांची तारांबळ 

ऑनलाईन टीम / ठाणे :

ठाण्यातील रिक्षाचालकांनी आज संप पुकारला असून यामुळे लोकांना प्रचंड मनस्तापला समारे जावे लागणार आहे. ठाणे महापालिकेचे अयुक्त संजीव जयस्वाल यांनी रिक्षाचालकांविरोधात केलेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी हा संप पुकारण्यात आला आहे.

ठाणे शहर ऑटो टॅक्सी संघर्ष कृती समितीने संपाची हाक दिली आहे. पालिका आयुक्तांनी ठाण्यातील फेरीवाले आणि रिक्षा चालकांवर गेल्या दोन आठवडय़ांपासून कारवाई सुरू केली आहे. 11 मे रोजी गावदेवी आणि स्टेशन परिसरात झालेल्या कारवाईच्यावेळी रिक्षा युनियनचे नेते राजू सावंत यांच्यासह काही रिक्षाचालकांना मारहाण झाल्याचा आरोप आहे. दरम्यान पालिका आयुक्त आणि रिक्षाचालकांच्या या वादामुळे प्रवाशांना मात्र अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. संपामुळे सकाळच्या वेळी कामावर निघालंल्या प्रवाशांची मात्र धावपळ होत आहे. ठाणे शहरात अनेकजण रिक्षानेच प्रवाश करत असल्याने रेल्वे स्टेशनपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना कसरत करावी लाग आहे. संपामुळे अनेकंची तारांबळ उडाली आहे.