|Wednesday, November 14, 2018
You are here: Home » मनोरंजन » ट्विटरने ब्लॉक केले परेश रावल यांचे अकाऊंट

ट्विटरने ब्लॉक केले परेश रावल यांचे अकाऊंट 

ऑनलाईन टीम / मुंबई :

अभिनेता आणि भाजप खासदार परेश रावल यांचे ट्विटर आकाऊंट ट्विटरने ब्लॉक केले आहे. त्यांचे अकाऊsट पाहू शकतो मात्र ते काही ट्विट करू शकत नाहीत. अरूंधती रॉय यांच्यासंबंधी ट्विट डिलीट केले नाही तर त्यांचे ट्विट अकाऊंट ब्लॉक करण्यात येईल अशी सुचना त्यांना ट्विटरकडून देण्यात आली होती. परेश रावल यांनी नकार दिल्यानंतल ट्विटरने ते ट्विट डिलीट करत अकाऊंट ब्लॉक केले आहे.

‘ट्विट डिलीट करण्यासाठी आपल्याला धमकावले जात होते.असा आरोप परेश रावल यांनी केला आहे. हे फक्त माझे एक ट्विटर अकाऊंट आहे, भारतीय पासपोर्ट नाही,असे परेश रावल यांनी म्हटले आहे. मायक्रो-ब्लॉगिंग वेबसाईटने आपल्याला अकाऊंट ब्लॉक करण्याची धमकी दिली होती असा दावा परेश रावल यांनी केला आहे.

 

Related posts: