|Monday, April 22, 2019
You are here: Home » Top News » ईव्हीएमबाबतचे आव्हान अद्याप कोणत्याही पक्षाने स्वीकारले नाही

ईव्हीएमबाबतचे आव्हान अद्याप कोणत्याही पक्षाने स्वीकारले नाही 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

ईव्हीएममध्ये फेरफार करता येत की नाही यासाठी घेण्यात येणाऱया मतदान यंत्राच्या चाचणीमध्ये कोणत्याही मान्यताप्राप्त राष्ट्रीय किंवा प्रादेशिक राजकीय पक्षाने सहभाग घेतला नसल्याचे निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी सांगितले.

ईव्हीएममध्ये फेरफार केला जात असल्याचा आरोप करणाऱया काँग्रेस, आम आदमी पक्ष, बहुजन समाज पक्ष आणि तृणमूल काँग्रेस या राजकीय पक्षांना ईव्हीएममध्ये फेरफार करण्याबाबतचे आव्हान देण्यात आले होते. त्यासाठी या राजकीय पक्षांना 3 जूनपर्यंतचा अवधीही देण्यात आला आहे. मात्र, याच्या सहभागासाठी 26 मेपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली. ही मुदत संपूनही कोणत्याही राजकीय पक्षाने यातील सहभागाबाबत अद्याप आव्हान स्वीकारले नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, आम्हाला या आव्हानाच्या सहभागाबाबत अद्याप सांगण्यात आले नसल्याचे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे कायदेशीर सेलचे प्रमुख विवेक तनखा यांनी सांगितले.

Related posts: