|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » Top News » पेट्रोल 30 रूपये लिटरने मिळणार ?

पेट्रोल 30 रूपये लिटरने मिळणार ? 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

सध्या पेट्रोलचे दर प्रतिलीटर 80 रूयांच्या आसपास आहे. मात्र नजीकच्या भविष्यात ते केवळ 30रूपये किंवा त्यापेक्षा कमी होण्याची शक्यता आहे. नवीन तंत्रज्ञान आणि अपारंपारिक ऊर्जा साधनांच्या विकसनामुळ पेट्रोलवरील इंधनासाठी अवलंबून राहणे कमी होईल. त्यामुळे पेट्रोलच्या मागणीत घट होऊन परिणामी पिंमतही घसरेल. अमेरिकेतील उद्योगपती आणि भविष्यवेत्ते टोनी सेबा यांनी हा दावा केला आहे.

टोनी यांनी काही वर्षापूर्वी जगभारत सौऊर्जेच्या मागणीत आणि निर्मितीत वाढ होण्याची भविष्यवाणी केली होती.ही भविष्यवाणी काही प्रमाणात का होईना खरी ठरली आहे. ज्यावेळी टोनी यांनी दावा केला होता, त्यावेळी सौरउर्जेवरील उपकरणांची आणि निर्माण होणाऱया उर्जेच्या किंमती आजच्या दहापट होत्या. सिलीकॉन व्हॅलीमध्यश उद्योजक म्हणून कार्यरत असणारे सेबा उद्योजकता आणि पर्यावरणपूरक उर्जेचे प्रचारक आहेत.

 

Related posts: