|Saturday, January 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » शहराच्या पाण्याचा व परिवहनाचा प्रश्न सोडविणार : खा. बनसोडे

शहराच्या पाण्याचा व परिवहनाचा प्रश्न सोडविणार : खा. बनसोडे 

सोलापूर :

 शहरातील पाण्­ााr पुरवठय़ाचा भविष्याचा विचार करून शहराला उजनीपासून समांतर जलवाहिनी आणण्याचा विषय आणि सध्या अडचणीत आलेल्या महापालिकेच्या परिवहन उपक्रमातील प्रश्नाबरोबरच चेसी क्रॅक बसेस बदलून घेण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाकडून लवकरच मार्गी लावू. येत्या काळात शहराच्या विकासात भर देणाऱया प्रश्नांची सोडवणूक करू, असे असल्याची माहिती खासदार ऍड. शरद बनसोडे यांनी सांगितले.  

      शहराच्या विविध प्रश्नासंबंधीचा आढावा घेण्यासाठी गुरूवारी आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांची भेट घेतली होती. शहरात सध्या पाण्याचा प्रश्न उद्भवत असल्याने यावर नियोजन करण्यासंबधी त्यांनी आढावा घेतली. उजनीतून नदीवाटे पाणी फिरवत आणण्यामध्ये मोठय़ा प्रमाणात अडचणी निर्माण होत आहेत. यामध्ये महापालिकेचे नुकसानही होत असल्याचे सांगण्यात येत आहे. महापालिकेने यापूर्वी 1240 कोटींची योजना राबविण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. तो सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला आहे. उजनीपासून समांतर जलवाहिनीच्या योजनेस गती मिळण्यासाठी आपण केंद्र शासनाकडे पाठपुरावा सुरू ठेवला आहे. केंद्रीय नगर सचिव यांच्याशी चर्चा झाली आहे. जलवाहिनीसाठी महापालिकेकडे अमृत योजनेचे 300 कोटी रूपये प्राप्त झाले आहेत. तर एनटीपीसीकडून 250 कोटी रूपये मंजूर झाले आहेत. यानुसार महापालिकेकडे सद्यस्थितीत 550 कोटी रूपये तयार आहेत. या योजनेसाठी केंद्र व राज्य शासनाकडून निधी मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. केंद्रीय उर्जामंत्री पियुष गोयल यांच्याकडेही पाठपुरावा करून काम मार्गी लावण्यासंदर्भात चर्चा झाली आहे. यावर लवकरच बैठक होऊन निर्णय घेण्यात येणार आहे.

      महापालिकेच्या परिवहन उपक्रमाची स्थितीही अत्यंत डबघाईला आली आहे. यावर विविध उपाययोजना करून ऊर्जितावस्था मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. केंद्रीय नगर विकासमंत्री व्यंकय्या नायडू यांच्याकडे मी स्वत: चेसी क्रॅक बसेस बदलून मिळण्यासाठी हट्ठ धरला आहे. यावर पाठपुरावा करून हा प्रश्नही मार्गी लावण्यात येणार आहे. शिवाय परिवहनकडील जास्तीत जास्त बसेस चालू करून मार्गावर आणण्यासाठी बंद बसेसच्या दुरूस्तीसाठी काही निधीतून प्रयत्न करण्यात येईल, असे खा. बनसोडे यांनी सांगितले.

     आयुक्तांशी चर्चा करताना त्यांनी महापालिकेतील आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उत्पन्नाचे स्रोत वाढविण्यासंदर्भात तसेच मोहीम घेऊन मिळकत करासह अन्य वसुली करण्यासंबधी चर्चा झाली. शहरातील कचऱयाची समस्या, पाणी, रस्ते व दिवाबत्ती यासह शहरवासियांना मुलभूत सोयी-सुविधा देण्यासाठी प्रशासन सक्षम करण्यास प्राधान्य देण्यासंदर्भात चर्चा झाली. 

Related posts: