|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » सय्यद नियामतला सात दिवस पोलीस कोठडी

सय्यद नियामतला सात दिवस पोलीस कोठडी 

प्रतिनिधी/ बेळगाव

रोहन रेडेकर (वय 23) या तरुणाचे अपहरण करुन खून केल्याच्या आरोपावरुन बेंगळूर येथील परप्पन अग्रहार कारागृहातून ताब्यात घेण्यात आलेल्या सय्यद नियामत उर्फ रेहमान (वय 29) याला शुकवारी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्दितीय न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला आठ दिवस पोलीस कोठडी दिली आहे.

सय्यद नियामत हा मूळचा बिस्मील्लानगर, बेंगळूरचा राहणारा असून खुनी हल्ला व खून प्रकरणी टिळकनगर पोलिसांनी त्याला यापूर्वीच अटक केले होते. नियामत हा कुख्यात गुंड रशीद मलबारीचा हस्तक असून बेंगळूरसह कर्नाटकातील विविध शहरात रशीदचे जाळे वाढविण्यासाठी त्याने मदत  केली होती.

18 फेब्रुवारी 2015 रोजी रोहन रेडेकरचे अपहरण झाले त्यावेळी नियामत हा रशीद सोबत होता. रोहनचे अपहरण व खून प्रकरणात नियामत हा दुसऱया क्रमांकाचा आरोपी असून गुरुवारी रात्री त्याला बेंगळूरहून बेळगावला आणण्यात आले होते. शुक्रवारी त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. चौकशीसाठी त्याला पोलीस कोठडीत घेण्यात आले.

बेळगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक  नारायण स्वामी हे या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत. खुनी हल्ला व खून प्रकरणी अटक होण्यापूर्वी सय्यद  नियामत हा सातत्याने रशीद मलबारीच्या संपर्कात होता. जिल्हा पंचायतीचे माजी अध्यक्ष नजीर नदाफ याच्या सांगण्यावरुन रशीद मलबारी व त्याच्या साथीदारांनी रोहन रेडेकरचे अपहरण केले. त्यावेळी त्याचा खून करण्याचा विचार कोणाच्याच मनात नव्हता. मात्र रशीद मलबारीनेच जर त्याला जीवंत सोडले तर आपले कारणामे उघड होतील, या भीतीने मारण्याचा निर्णय घेतला, अशी धक्कादायक माहिती पोलीस तपासात उघडकीस आली आहे.

Related posts: