|Monday, July 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » मराठी माध्यमांतील काहीच शिर्षक पुस्तके उपलब्ध

मराठी माध्यमांतील काहीच शिर्षक पुस्तके उपलब्ध 

प्रतिनिधी / बेळगाव

सोमवार दि. 29 पासून 2017-18 च्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात होणार आहे. यामुळे शिक्षण खात्याच्यावतीने नूतन शैक्षणिक वर्षाची पूर्वतयारी सुरू झाली आहे. शाळा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वितरण करण्यासाठी शिक्षण खात्याने प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, अद्यापही सर्व माध्यमांची सर्व पुस्तके उपलब्ध झाली नसल्याने विद्यार्थ्यांना शाळा सुरू होताच सर्व पुस्तके मिळण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. यातच मराठी माध्यमातील 30 पैकी केवळ 8 ते 9 च शिर्षक पुस्तके उपलब्ध झाल्याने मराठी भाषिक विद्यार्थ्यांवर शिक्षण खात्याच्यावतीने जाणूनबुजून अन्याय केला जात आहे.

येथील सरदार्स हायस्कूलच्या प्रांगणात असलेल्या गोडाऊनमध्ये 2017-18 शैक्षणिक वर्षाची सर्व माध्यमातील असंख्य पुस्तके दाखल झाली आहेत. तर शहरातील बऱयाच शाळांनी येथून पुस्तके घेवून जाण्यास सुरुवात केली आहे. शहर परिसरातील सुमारे 342 शाळांना येथून पुस्तकांचा पुरवठा होत आहे. यामध्ये मराठी, कन्नड, इंग्रजी आणि उर्दू या चारही माध्यमांची शिर्षक पुस्तके या गोडाऊनमध्ये उपलब्ध झाली आहेत. मात्र, मराठी माध्यमातील 30 शिर्षक पुस्तकांपैकी केवळ 8 ते 9 शिर्षक पुस्तके उपलब्ध असून कन्नड माध्यमातील 54 शिर्षक पुस्तकांपैकी केवळ 22 शिर्षक पुस्तके सध्या याठिकाणी उपलब्ध आहेत. येत्या दोन दिवसातच नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार आहे. तरीही शिक्षण खात्याने सर्व पुस्तके उपलब्ध करण्याबाबत अद्यापही गांभीर्याने प्रयत्न केले नसल्याचे दिसून आले आहे.

सर्व माध्यमांची आणि विषयाची पुस्तके उपलब्ध होण्यास जूनचा पंधरवडा लागण्याची शक्मयता आहे. या गोडाऊनमध्ये दि. 11 एप्रिलपासूनच विविध माध्यमांची आणि विषयाची पुस्तके उपलब्ध झाली असली तरी मराठी माध्यमातील 30 पैकी केवळ 8 ते 9 शिर्षक पुस्तके उपलब्ध करण्यात आली आहेत. शिक्षण खात्याने जाणूनबुजून मराठी विद्यार्थ्यांवर हा अन्याय केल्याचे दिसून येत आहे. तर वेळेवर छपाई न झाल्याने तसेच पेपरच्या अभावामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे येथील अधिकारी  एस. जी. हक्कलदवर यांनी सांगितले.